Latest Marathi News
Ganesh J GIF

अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोईच्या नावे धमकीचा मेसेज; एका संशयिताला अटक, सलमानच्या सुरक्षेत वाढ

 गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला गेल्या काही वर्षांपासून टार्गेट करत आहे. नुकतेच सलमान खानच्या जवळचे समजले जाणारे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली. यानंतर आता सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

याचदरम्यान एक माहिती समोर आली आहे, सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईच्या नावे पन्हा धमकीचा मेसेज आला आहे. मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने स्वतःला लॉरेन्स बिश्नोई टोळीचा जवळचा असल्याचे सांगितले आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर हा धमकीचा संदेश आला आहे. यामध्ये अभिनेता सलमान खानचे लॉरेन्स बिश्नोईसोबतचे दीर्घकाळचे वैर संपवण्यासाठी ५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. ‘हलक्यात घेऊ नका, अन्यथा सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल’, असेही संदेशात लिहिले आहे. या मेसेजमुळे एकच खळबळ माजली असून सुरक्षा एजन्सींची चिंता वाढली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

 

दरम्यान, सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी नुकतीच हरियाणातील पानिपत येथून एका संशयिताला अटक केली. सुक्खा कालूयाला असे त्याचे नाव असून पनवेल शहर पोलीस आणि हरियाणा पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. आज सुक्खा कालूयाला पनवेल कोर्टात हजर करण्यात येणार आहे. सलमानच्या सुरक्षेसाठी जवळपास १०० मुंबई पोलिसचे जवान तैनात करण्यात आले आहेत. वांद्र्यातील सलमानच्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट्स’बाहेर २४ तास पोलिसांचा पहारा आहे. गॅलेक्सी अपार्टमेंट्सजवळ ६० पेक्षा जास्त पोलीस अधिकारी सामान्य कपड्यांमध्ये तैनात करण्यात आले आहेत. या परिसरात संशयास्पद व्यक्तीवर पोलिसांचे बारकाईने लक्ष असणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!