Latest Marathi News
Ganesh J GIF

हडपसर मतदारसंघातील शिवसैनिक अधिक आक्रमक ; हडपसर ते मुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानापर्यंत शिवसैनिकांचा पायी प्रवास, नेमकं प्रकरण काय ?

 आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीतून राजकीय हालचालींना वेग आला आहे. काल भाजपने ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात पुण्यातील कोथरूड, पर्वती,  शिवाजीनगर  या तिन्ही मतदारसंघातील विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली. दरम्यान या मतदारसंघात इच्छुक नाराज झाले आहेत. ते बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत.

आज सायंकाळ पर्यंत शिवसेना, राष्ट्रवादीची यादी येण्याची शक्यता आहे. दरम्यान हडपसर मतदारसंघातील शिवसैनिक अधिक आक्रमक झाले असून हडपसर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर पायी चालत निघाले आहेत.शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हडपसर मतदारसंघ हा शिवसेनेसाठी सोडावा आणि या जागेवरून नाना भानगिरे यांना उमेदवारी देण्यात यावी, या मागणीसाठी शिवसैनिक पायी चालत निघाले आहेत.शहरातील हडपसर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चेतन तुपे हे आमदार असून त्यांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

दुसर्‍या बाजूला याच मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी आणि शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे हे देखील इच्छुक आहेत. या दोघांपैकी कोणाला उमेदवारी द्यायची हा पेच महायुतीमधील नेत्यासमोर निर्माण झाला आहे.त्याच दरम्यान काल सायंकाळी शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांना हडपसरमधून उमेदवारी दिली जावी, या मागणीसाठी हजारो शिवसैनिक आणि नागरिकांनी प्रभू श्रीराम यांच्या चरणी प्रार्थना आणि महाआरती केली. या माध्यमांतून नाना भानगिरे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!