Latest Marathi News
Ganesh J GIF

“छत्रपती शासन” या नवीन पक्षाची राजकारणात एन्ट्री ! बारामतीतून अजित पवारांना देणार उमेदवारी

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. जवळपास सर्वच महत्त्वाच्या उमेदवारांची घोषणा झाली आहे.२९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. अशातच आता महाराष्ट्रात आणखी एका नवीन राजकीय पक्षाची स्थापना झाली आहे.

‘शिवाजी द मॅनेजमेंट गुरू’ पुस्तकाचे लेखक नामदेव जाधव यांनी स्वतःचा पक्ष काढत महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री केली आहे. छत्रपती शासन असं या पक्षाचं नाव असून यंदाच्या निवडणुकीत २८८ जागांवर उमेदवार देणार आहेत. लेखक नामदेव जाधव यांनी स्वतः चा पक्ष काढला असून कुणाला विधानसभा निवडणूक लढवायची असेल आणि कोणताच पक्ष उमेदवारी देत नसेल, तर हा पक्ष एक पर्याय असेल. नामदेव जाधव यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यात २ हजार १३६ मते मिळाली होती. ती दारू न पाजता, पैसे न देता आणि कुणाच्या पाया न पडता मिळवली असल्याचं नामदेव जाधव यांनी सांगितले आहे. या निवडणुकीत जाधव यांचे डिपॉझिट जप्त झाले, मात्र डिपॉझिटची चिंता कसली, सरकारकडे महसूल दिला. २५ हजार माझा कर भरला. विधानसभेला २८८ जागा लढवणार आहोत.

प्रस्थापित पक्षाकडे उमेदवारीसाठी १०-१० कोटी मोजावे लागतात. ५० कोटी त्यांचे निवडणुकीचे बजेट आहे. आम्ही छोटं रोपटं लावतोय. त्याचे वटवृक्ष होईल, असा विश्वास नामदेव जाधव यांनी व्यक्त केला आहे.पुढे बोलताना म्हणाले, सध्या मी उभा राहणार नाही. माझी जबाबदारी वाढलेली आहे. प्रचारयंत्रणा राबवणे, गावोगावी जाणे प्रचार करणे हे माझे काम आहे. उमेदवार निवडीवर आमचा फोकस आहे. आमचे १५ उमेदवार निवडून आले तरी मी राज्यसभेवर जाणार आहे, याची काळजी करू नका. बारामती विधानसभेत अजित पवार नावाचा तरूण उमेदवार देणार असून तो तरूण लढाऊ आहे. हा तरुण कोरेगावचा आहे. कोरेगावातून तो बारामती विधानसभेत लढवणार आहे, असंही नामदेव जाधव यांनी यावेळी सांगितले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!