लग्नाच्या चार दिवसानंतर पत्नीने केली पतीची हत्या
प्रियकराच्या मदतीने काढला पतीची काटा, असे केले हत्येचे नियोजन
गांधीनगर- गुजरातच्या गांधीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने लग्नाच्या चार दिवसांनीच पतीची हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलेचे तिच्या चुलत भावावर प्रेम होते. पण कुटुंबाचा विरोध असल्यामुळे पत्नीने चार दिवसातच पतीची हत्या केली आहे. पोलीसांनी पत्नीला अटक केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबादच्या वटवा येथील २४ वर्षीय भविक आणि कोटेश्वर येथील पायल यांचे लग्न १० डिसेंबर रोजी थाटामाटात पार पडले. हे दोन्ही कुटुंबांच्या परस्पर संमतीने झालेले अरेंज्ड मॅरेज होते. पत्नी पायलला हे लग्न मान्य नव्हते असे संकेत पती भविकला मिळाले. पण लग्न झाले आहे. समजूतदारपणे राहावे असे म्हणत सर्व काही सहन करणाऱ्या भविकचा शेवटी दुर्दैवी अंत झाला. १० डिसेंबर रोजी लग्न झाले असता, पत्नी पायल १२ डिसेंबर रोजी शास्त्राच्या नावाखाली माहेरी गेली. त्यामुळे १३ डिसेंबर रोजी पायलला आणण्यासाठी भविक गेला. पण तो आलाच नाही. पायलच्या वडिलांनी भाविकच्या कुटुंबाला फोन केला. त्यांनी विचारपूस केली असता. तो खूप आधीच निघून गेल्याचे त्यांनी सांगितले. झडती घेतली असता भाविकची स्कूटर रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत आढळून आली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की एसयूव्हीमध्ये प्रवास करणाऱ्या तीन जणांनी त्याच्या वाहनाला धडक दिली. ज्यामुळे तो खाली पडला आणि नंतर त्याचे अपहरण केले. आणि नंतर त्याची हत्या करण्यात आली. पोलिसांनी आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत खून, कट आणि अपहरणाची कलमे लावली आहेत. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील पुरावे गोळा करण्यासाठी तपास सुरू आहे.
पायलच्या कुटुंबीयांनी पोलिसांना याची माहिती दिली, लग्नाला कमी कालावधी झाला असल्याने त्यांचा संशय वाढला. चौकशी केली असता
आपल्या प्रियकर चुलत भावासोबत पळून जाण्यासाठी भविक अडथळा ठरू शकतो म्हणून पायलने कल्पेश आणि दोन साथीदारांसह पतीच्या हत्येचा कट रचल्याची कबुली दिली.