
यवतमाळ – यवतमाळ जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या लोकांनी विवसहितेची हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्या करुन आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केल्याचेही यावेळी सिद्ध झाले आहे.
पल्लवी विकास भुतेकर या विवाहितेने आत्महत्या केली नसून तीचा खून झाल्याचे वैद्यकीय अहवालातून समोर आले आहे. पल्लवीचा मृतदेह मुडाणा येथे शेतातील विहिरीत आढळून आला होता. दरम्यान या संदर्भात फिर्यादीने दिलेल्या फिर्यादी नुसार पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्हा दाखल करून, आरोपी सासरे आणि पतीस अटक केली होती. पण पल्लवीच्या नातेवाईकांनी पल्लवीची आत्महत्या नसून हा खूनच आहे असा संशय होता. त्यामुळे त्यांनी आंदोलन देखील केले होते. त्यामुळे घटनास्थळी पोहोचल्यानंतर मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांची अतिरिक्त कुमक आणि दंगल नियंत्रक पथक मुडाणा येथे तैनात करण्यात आले होते. पल्लवीचा आंतरजातीय प्रेमविवाह मुडाणा गावातीलच विकास प्रकाश भुतेकर यांच्यासोबत पाच वर्षांपूर्वी झाला होता. या प्रेमविवाहाला घरच्यांचा विरोध असल्याने पल्लवीच्या माहेरच्या मंडळीचा भुतेकर यांच्या कुटुंबाशी अंतर राखले होते. तिकडे पल्लवीच्या सासरच्या मंडळीकडून तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत होता. त्यामुळे घरात नेहमीच कुरबुरी होत असत. यातून हा प्रकार घडला आहे. आता पोलिसांनी हत्या केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
अखिल भारतीय वडार सक्षम संघाचे प्रदेशाध्यक्ष विलास पवार व भटक्या जाती,विमुक्त जमाती प्रदेशाध्यक्ष संगीता पवार आणि पल्लावीच्या आईवडिलांनी पल्लवीचे शव विच्छेदन यवतमाळ जिल्हा रुग्णालयात इन कॅमेरा करण्याची मागणी लावून धरली होती. त्याला यश आले आहे.