
पैठण दि ४ (प्रतिनिधी) – ‘पत्नीला सोडून माझ्याशी लग्न कर’, असा तगादा प्रेयसीने लावल्यामुळे गणेश मुसळे या ३.’तुझ्या बायकोला सोडून दे आणि माझ्याशी लग्न कर,’० वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. ही घटना पैठण तालुक्यातील लोहगाव येथे घडली आहे. विवाहबाह्य संबंधांतून झालेल्या त्रासामुळे गणेशने आत्महत्या केली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश सुभाष मुसळे या तरुणाचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र त्याचे गावातील दुसऱ्या एका महिलेशी अनैतिक प्रेमसंबंध होते. स्वतःचे लग्न झाल्यानंतरही त्याचे दुसऱ्या महिलेशी प्रेमप्रकरण सुरूच होते.पण आता गणेशच्या प्रेयसीने त्याच्याकडे लग्नासाठी तगादा लावण्यास सुरूवात केली होती.’तुझ्या बायकोला सोडून दे आणि माझ्याशी लग्न कर,’ असं गणेशची प्रेयसी त्याला वारंवार सांगत होती. त्यामुळे मानिसक तणावात आलेल्या गणेशने स्वत:चे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणी गणेशच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेशच्या लग्नाला काही वर्ष उलटून गेल्यानंतरही त्याचे दुसऱ्या महिलेशी प्रेमप्रकरण सुरूच होते. हेच प्रेमसंबंध अखेर त्याच्यासाठी घातक ठरले.पोलीस तपास करत आहेत.