Just another WordPress site

सगळे आमदार निवडून आणू म्हणणारे एकनाथ शिंदेच पराभूत होणार?

आकडेवारीतून धक्कादायक वास्तव समोर, पहा काय आहेत आकडे

मुंबई दि ४ (प्रतिनिधी) – ‘एक जरी आमदार पडला तरी गावी शेती करायला निघून जाईन असं म्हणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या स्वतः च्या मतदारसंघात त्यांनाच निवडून येण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ४० पैकी किती आमदार निवडून येणार याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात. त्यांनी बंडखोरी केल्यानंतर ठाण्यातून त्यांना सर्वाधिक पाठिंबा मिळाला होता. पण २०१४ साली शिवसेनेने स्वबळावर लढवलेली निवडणूक आणि २०१९ साली भाजपासोबत युतीत लढवलेली निवडणूक यातील मतदान पाहिल्यानंतर शिंदेनाच विजयी होण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. ठाण्यात आणि एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातील भाजपाचा मतदार एकनाथ शिंदे यांना मतदान करत नसल्याचे समोर आले आहे २०१९ मध्ये हा फरक ठळकपणे समोर आला होता. हा फरक आकड्यांमध्ये पाहिल्यास दिसून येईल.

शिवसेनेने स्वबळावर लढवलेल्या २०१४ मधील निवडणूकीत एकनाथ शिंदे यांना १ लाख ३१६ मते मिळाली होती तर भाजपाचे संदीप लेले यांना ४८ हजार ४४७ मते मिळाली होती. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात लढले होते पण त्यांच्या एकूण मतांची संख्या २१ हजार होती. पण २०१९ मधील युतीत लढलेल्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेना १ लाख १३ हजार ४९७ मते मिळाली होती. तर आघाडीच्या घाडीगावकर यांना २४ हजार १९७ मते मिळाली होती. मनसेला २१ हजार तर वंचितला ६ हजार मते मिळाली होती. वास्तविक शिंदेना दीड लाख मते मिळणे अपेक्षित असताना फक्त १३ हजार मतेच वाढली. पण आघाडीच्या मताची बेरीज २१ हजार असताना २४ हजार मते मिळाली. त्यामुळे आगामी निवडणूकीत भाजपाची सगळी मते शिंदेला मिळतीलच याची शाश्वती नाही. भाजपचा मतदार आहे, पण तो युतीत शिवसेनेला मतदान करत नाही. कमीत कमी ठाण्यात तरी हे वास्तव समोर आले आहे.

GIF Advt

एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघात गुजराती, मारवाडी, जैन असा अमराठी मतदार मोठ्या संख्येने आहे. युती झाल्यास भाजप उमेदवार नसल्याने तो मतदानाकडे पाठ फिरवतो. म्हणजे एकनाथ शिंदेंना मतदान करणारे उमेदवार हे शिवसेनेचे पारंपरिक मतदार आहेत. त्यामुळे मोदींमुळे भाजपची मतं आम्हाला मिळाली आणि सेनेचे उमेदवार निवडणूक आले हा एकनाथ शिंदेंचा दावा तितकासा बरोबर नाही. हेच आकडेवारी वरून दिसत आहे. याचबरोबर भाजपाच्या ठाण्यात आणि शिंदेच्या मतदारसंघात पक्षाची ताकत वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर शिवसेनेचा सगळा मतदार एकनाथ शिंदेच्या बरोबर जाणार नाही कारण विचारे आणि आनंद दिघे सारखे नेते ठाकरेंसोबत असल्याने आणि ठाकरे शिवसैनिक असे समीकरण असल्याने एकनाथ शिंदेना सेनेचे सगळेच मतदान होणार नाही.हीच परिस्थिती इतर उमेदवारांच्या मतदारसंघात आहे. कारण आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेला मिळालेला प्रतिसाद आणि त्या आमदारांच्या सभांना मिळालेला प्रतिसाद यात फरक होता. त्याचबरोबर शिंदेना न्यायालयीन लढाईत अपयश आले तर त्यांनाच एखाद्या पक्षात जावे लागणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेना आत्तापासूनच विधानसभा निवडणूकीचे नियोजन करावे लागणार आहे.

आपण शिवसैनिक आहोत जिथे लाथ मारु तिथून पाणी काढू. ५० पैकी एकही आमदार पडू देणार नाही भाजपाचे ११५ मिळून आम्ही २०० करणार हा एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी त्यांना आता भाजप, ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादी आणि मनसे या आघाड्यांवर काम करावे लागणार आहे. त्यात भाजप मित्रपक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात प्रचार करतो असे आरोप करणारे आमदार आता शिंदे गटात आहे. त्यामुळे शिंदे कोणती रणनिती राबवतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!