अगोदर एकनाथ कुठे आहे? नंतर रोहित कुठ आहे?
महाराष्ट्रात या डायलाॅगची होतेय जोरदार चर्चा, कोण आहे चर्चा होत असलेला रोहित?
बीड – एकनाथ शिंदे यांनी २०२२ साली शिवसेनेत बंड केल्यानंतर धर्मवीर चित्रपटातील एकनाथ कुठयं हा डायलाॅग चांगलाच गाजला होता. पण आता आणखी एक नवीन डाॅयलाॅग समोर आला आहे. या डायलाॅगची जोरदार चर्चा होत आहे.
पवन चक्की कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणातील संशयीत आरोपी वाल्मीक कराड याच्याविरोधात काल मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कराड याला न्यायालयात दाखल करण्यात आले होते, पण प्रकृती खराब असल्यामुळे कराडला न्यायालयातून रुग्णालयात तपासणीसाठी हजर करण्यात आले. यावेळी रुग्णालयातून बाहेर पडत असताना वाल्मीक कराड याने रोहित कुठे आहे? ,असा प्रश्न केला. तर पोलीस आणि कराड समर्थकांनीदेखील रोहितला आवाज दिला. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर अनेकांनी हा रोहित आहे तरी कोण? असा प्रश्न उपस्थित केला होता. कराड याने बोलावलेला रोहित नेमका कोण आहे? याचे उत्तर भाजपा आमदार सुरेश धस यांनी दिले आहे. आमदार धस म्हणाले, रोहित हा त्याच्या हाताखाली काम करणारा कर्मचारी आहे. त्याच नाव रोहित कांबळे आहे. त्याची मदत लागत असेल. त्यालाही पोलिसांच्या गाडीत बसवून नेलं आहे, अशी माहिती धस यांनी दिली आहे.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात प्रमुख आरोपी वाल्मिक कराड याला केज कोर्टाकडून ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे वाल्मिक कराड २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत असणार आहे.