भीतीदायक! पुण्यात पतीने पत्नीची गळा चिरुन केली हत्या
पत्नीचा खून करुन व्हिडिओ व्हायरल, स्वतः पोलिसात हजर म्हणाला 'ती माझ्या घराची लक्ष्मी पण..'
पुणे – पुण्याच्या खराडीत कौटुंबीक वादातून पतीने पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने शिलाई मशीनच्या कात्रीने पत्नीवर वार करुन खून केला. विशेष म्हणजे या हत्येचा व्हिडिओ देखील पतीने शेअर केला आहे. या हत्येमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
ही घटना बुधवारी पहाटे खराडीतील तुशजाभवानी नगर परिसरात घडली आहे. ज्योती गिते असं मृत महिलेचा नाव आहे. तर शिवदास गिते असं आरोपीचं नाव आहे.मिळालेल्या माहिती अशी की, शिवदास गिते हा मूळचा बीडचा असून, न्यायालयात टंकलेखक आहे. खडकी भागात तो भाडेतत्वावर खोली घेऊन राहत होता. काही दिवसांपासून ज्योती आणि शिवदास यांच्यात कौटुंबिक कारणावरुन वाद सुरु होता. बुधवारी पहाटे देखील या दोघांमध्ये वाद झाला. यावेळी पती शिवदास गीते याने शिलाई मशीनच्या कात्रीने पत्नी ज्योती गिते यांच्या गळ्यावर वार केले. यातच तिचा मृत्यू झाला. आरोपी पती शिवदास गिते याने या प्रकरणी माहिती देणारा व्हिडीओ देखील शूट केला आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, मला मारायचा प्रयत्न केला हे मला उशिरा कळलं. मला माझ्या संरक्षणासाठी हा सगळा प्रकार करावा लागला. माझी इच्छा नव्हती तिला माराव किंवा काही करावं. माझ्या घराची लक्ष्मी होती. या मुलीने माझ्या मुलाला जन्म दिला. तिचे सगळे भाऊ वाढीव आहेत. तिच्या भावाने मला मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला माराव लागलं. मला या महिलेने मारून टाकण्याचा प्रयत्न केला होता. या महिलेने तिची माणसं पुण्यात पेरलेली आहेत. असा दावा गीते याने केला आहे. नुकत्याच १५ जानेवारीला झालेल्या एका परीक्षेत शिवदास हा नापास झाल्यामुळे त्याला कामावरून कमी केले होते. परीक्षा परत देण्यासाठी ज्योती अनेक वेळा शिवदासला सांगत होती. त्यामुळे त्यांच्यात वाद होत होते. दरम्यान पत्नीची हत्या केल्यानंतर शिवदास स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला. चंदननगर पोलिस ठाण्यात शिवदास विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये ज्योती आणि शिवदास गीते यांचे लग्न केले होते. हे दाम्पत्य मूळचे बीडचे असून पुण्यातील खराडी भागात वास्तव्यास होते. या दाम्पत्याला ५ वर्षाचा अथर्व नावाचा एक मुलगा सुद्धा होता. ज्योती शिलाई मशीनद्वारे कपडे शिवण्याचे आणि धुणे भांड्यांची कामे करत होती. तर दुसऱ्या बाजूला शिवदास गिते हा शिवाजीनगर दिवाणी न्यायालय येथे स्टेनो म्हणून कार्यरत आहे.