‘आमच्यावर हल्ला झाला तर आमदार, मंत्री यांना सोडणार नाही’
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा, आंदोलन स्थगित, पुढील दिशाही केली स्पष्ट
जालना – मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी २५ जानेवारीपासून उपोषणाला सुरुवात केली होती. मात्र आज सहाव्या दिवशी त्यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे. आता यापुढे उपोषण करणार नसून थेट मुंबईकडे कुच करुन समोरासमोरची लढाई होईल असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
हे आंदोलन आपण स्थगित करत आहोत. यापुढे उपोषण होणार नाही. आता समोरा-समोर लढायची तयारी ठेवायची, असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला आहे. मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिला आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईत जाणार असेही जरांगे पाटील म्हणाले आहेत. यावेळी शासनाचे प्रतिनिधी म्हणून खासदार बजरंग सोनवने, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळुके आणि सरकारी अधिकारी उपस्थित होते. मनोज जरांगे यांच्या आठ मागण्या होत्या. त्या पैकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चार मागण्यावर सकारात्मक आहेत. माजी न्यायमुर्ती शिंदे यांच्या समितीला एक वर्षाची मुदत वाढ देणे, राज्यात कुणबी नोंदी शोधून काढणे, गॅजेट तपासुन त्याचा अहवाल घेऊन कार्यवाही करणे, दाखल गुन्हे उच्च न्यायालय यांच्याकडून विचारूण, तपासुन, वापस घेण्याची प्रकिया करणार आहे. कुणबी प्रतापत्र देण्यासाठी जिल्हा तालुका स्थरावर कार्यवाही चालू करण्यात येईल. यासाठी शासन व मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे आमदार सुरेश धस यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता सरकार या मागण्या ठराविक वेळेत पूर्ण करणार का? हे पहावे लागेल.
सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी व मागण्या मंजूर झाल्या नाहीतर मुंबईला मोर्चा नेणार, मुंबईला जाण्यासाठी नियोजन करणार, यामध्ये आमच्यावर हल्ला झाला तर आमदार, मंत्री यांना सोडणार नाही. आंदोलन करू, आता माघार नाही, हे उपोषण, आंदोलन स्थगित करतो, शक्यतो या पुढे उपोषण करणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस हे आमच्या सोबत गद्दारी करतात का पाहयाचे आहे, असे जरांगे पाटील म्हणाले आहेत.