‘बुरखा आमच्या धर्माचा विषय तो घालूनच परीक्षा देणार’
मुस्लीम विद्यार्थिनींकडून मंत्री नितेश राणेंना ओपन चॅलेंज, शिक्षण मंत्र्यांनीही राणेंना सुनावले
मुंबई – इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेत बुरखा घालून परीक्षा देण्यास परवानगी नाकारण्यात यावी, अशी मागणी नितेश राणे यांनी शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे. त्यांच्या या मागणीनंतर मुस्लीम विद्यार्थिनींनी राणेंना ओपन चॅलेंज दिलं आहे.
नाशिकच्या नांदगाव येथील एच. आर. हायस्कूलच्या इयत्ता दहावीच्या मुस्लीम विद्यार्थिनींनी राणेंना दिलं आहे. ती म्हणाली, ‘बुरखा हा आमच्या धर्माचा विषय आहे, आस्थेचा विषय आहे. त्यामुळे आम्ही बुरखा घालूनच परीक्षा देणार’ असे म्हणत राणे मुद्दाम एका विशिष्ट समाजाला टार्गेट करत आहेत असा गंभीर आरोप करत विद्यार्थिनीने केला आहे. तसेच आम्ही शिक्षण मंत्र्यांना विनंती करतो, की असे वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी या विद्यार्थिनींनी शालेय राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे. शासनाने शिक्षणावर भर दिला पाहिजे. ड्रेसवर, हिजाबवर आणि बुरख्यावर जोर देऊन काही होणार नाही. ज्यांना कॉपी करायची आहे ते कसेही कॉपी करतील. भारतात सर्वधर्म समभाव आहे आणि सर्वांना समान अधिकार आहे. त्यामुळे आम्ही ज्या कपड्यात कम्फर्टेबल आहे, त्याच कपड्यांमध्ये आम्ही परीक्षा देऊ शकतो, असे म्हणत भिवंडीतील मुलींनी नितेश राणे यांच्या मागणीला विद्यार्थ्यांनी विरोध दर्शविला आहे. दुसरीकडे कोणी विद्यार्थी कॉपी करणार नाही याची शिक्षण विभाग काळजी घेत आहे. बुरखा घातलेला असू दे किंवा विना बुरखा घातलेला असू दे, कोणी विद्यार्थी कॉपी करणार नाही. अशी प्रतिक्रिया दादा भूसेंनी यावेळी दिली आहे. त्यामुळे बुरखा बंदीच्या मागणीवर नितेश राणे एकाकी पडले आहेत.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा या पारदर्शकपणे होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे बुरखा घालून इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा उपयोग करून परीक्षा देत आहे की नाही, हे तपासणे शक्य होत नाही. त्यामुळे अशावेळी बुरखा घालून परीक्षा देण्यात बंदी घालण्यात यावी. अशी मागणी राणे यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली होती.