अर्थसंकल्पानंतर पहा काय महाग अन् काय स्वस्त?
मोदी सरकारने बजेटमधून सर्वसामान्यांना काय दिले, वस्तूंची संपूर्ण यादीच समोर, एकदा वाचाच
दिल्ली – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. सलग आठवा अर्थसंकल्प सादर करत त्यांनी अनोखा विक्रम केला. अर्थसंकल्पात सरकारने सर्वांचा विकास यावर भर दिला असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सागितलंय. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर काय स्वस्त, काय महाग होणार? याकडे संपूर्ण देशातील जनतेचं लक्ष लागले होते.
नवीन अर्थसंकल्पात सरकारने उत्पादनं आणि सेवा यांच्यावर लागू होणाऱ्या प्रत्यक्ष (डायरेक्ट) आणि अप्रत्यक्ष (इन-डायरेक्ट) करांमध्ये बदल केले आहेत. त्यामुळे काही वस्तू स्वस्त होतील, तर काहींच्या किंमती वाढू शकतात. दरवर्षी बजेटनंतर काही गोष्टी स्वस्त होतात तर काही महाग होतात. निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये अनेक गोष्टी स्वस्त करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी इलेक्ट्रिक वाहनांवर कर कमी करण्याची घोषणा केली आहे. यामुळे इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करणे स्वस्त होईल.
काय स्वस्त?
केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये टीव्ही, मोबाईल, औषधे आणि इलेक्ट्रिक कार स्वस्त होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच एलईडी, एलसीडी टीव्ही, लहान मुलांची खेळणी, भारतात तयार केलेले रेडिमेड कपडे, विमा, चामड्याच्या वस्तूही स्वस्त होणार आहेत. तसेच ३६ जीवनावश्यक औषधांना करामध्ये सूट देण्यात आली आहे. त्याचबरोबर कॅन्सरची औषधं स्वस्त होणार असून कॅन्सरच्या ३६ औषधांवरची कस्टम ड्युटी हटवली आहे.
काय महाग?
प्रामुख्याने घराच्या किंमतीमध्ये वाढ होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच मोठे टीव्ही, बऱ्याच आवश्यक वस्तूंवर सीमाशुल्क कमी सूट दिली जाणार आहे. विशेषताः तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रामध्ये महागाई होणार असल्याचे संकेत या बजेटमधून दिले आहेत.