छेड काढणाऱ्या तरुणाची महिलेने केली जोरदार धुलाई
तरूणाच्या धुलाई सीसीटीव्हीत कैद, चप्पलाने मारहाण करत शिकवला धडा, एकदा बघाच!
मुरादाबाद – उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमध्ये स्कूटरवरून जाणाऱ्या पती-पत्नीला त्रास दिल्याने संतप्त महिलेने तरूणाला धडा शिकवत मारहाण केली आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मुरादाबाद एक महिला पतीसोबत स्कुटीवरुन जात असताना एका तरूणाने महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे संतापलेल्या महिलेने त्याची चांगलीच धुलाई केली आहे. महिला आपल्या अपंग पतीसोबत जात असताना दारूच्या दुकानासमोरील एका तरूणाने महिलेकडे पाहत अश्लील हातवारे केले. त्यामुळे महिलेले आपल्या पतीच्या कुबड्याने तरुणाची चांगलीच धुलाई केली आहे. विशेष म्हणजे अपंग नव-यादेखील तरुणाला चांगलाच चोप दिला. या घटनेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, हा माणूस जवळच्या भागातील असून विशेषतः दारू पिऊन महिलांशी गैरवर्तन करण्यासाठी ओळखला जातो. अशा कृत्यासाठी त्याला मारहाण होण्याची ही पहिलीच वेळ नाही.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीसांनी गुन्हा दाखल न करता हद्दीचा हवाला देत ठाकूरद्वारा पोलीस स्टेशनच्या प्रभारींना चौकशी व आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.