Latest Marathi News
Ganesh J GIF

पार्किंग एरियामध्ये खेळणाऱ्या चिमुकल्याला कारने चिरडले

भयानक अपघात सीसीटिव्हित कैद, कारचालक फरार, चूक कोणाची व्हिडिओ व्हायरल

नाशिक – नाशिकमध्ये काल एक दुर्दैवी अपघात घडला आहे. हॉटेलच्या पार्किंगमध्ये कारखाली चिरडल्या गेल्याने एका चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. बुधवारी संध्याकाळी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाजवळील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

ध्रुव राजपूत असे मृत मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ध्रुव त्याच्या वडिलांसोबत गार्डनमध्ये खेळण्यासाठी गेला होता. खेळून झाल्यावर तो त्याच्या वडिलांसोबत परत येत होता. पार्किंगमध्ये ध्रुवचे वडील मोबाईलवर पाहत असताना पाठीमागून त्यांचा मुलगा पळत आला. त्याने समोरून येणारी गाडी पाहिली नाही. पण गाडीसमोर आल्यानंतर त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. कारचालकानेही तशीच गाडी पुढे नेली. ही घटना घडल्यानंतर तिथे सगळे जण धावत आले. त्यांनी कार चालकाला चोप दिला. हॉटेलमधल्या सुरक्षा रक्षकांनी ध्रुवला हॉस्पिटलमध्ये नेलं. पण उपचारावेळी त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. अपघाताची ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. दरम्यान ध्रुवच्या वडिलांचं आणि कार चालकाचं लक्ष असतं तर कदाचित त्या लहान मुलाचा जीव वाचला असता, अशी भावना स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्दैवी अपघातानंतर हॉटेलच्या पार्किंग आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

 

घटनेची माहिती मिळताच इंदिरा नगर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि फरार आरोपी चालकाचा शोध सुरू आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!