
खास आठवण सांगत मिसेस मुख्यमंत्र्यांचे नवे कोरे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला
गाण्याला प्रेक्षकांची जोरदार पसंती, काैतुकाचा वर्षाव, मिसेस मुख्यमंत्र्यांचा या अनोख्या लूकमधील डान्स तुफान व्हायरल
मुंबई – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहण्याच्या प्रयत्नात असतात. आता त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. पण यावेळेच कारण जरासे वेगळे आणि हटके आहे.
अमृता फडणवीस या उत्तम गायिका असून त्यांनी स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. कायमच आपल्या गाण्यांमुळे चर्चेत असतात. त्यांनी आपण गाणे गात राहणारच असे अनेकदा स्पष्टही केले आहे. आता त्यांचे एक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या १५ फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराजांची जयंती आहे. त्यानिमित्ताने अमृता फडणवीस यांचे ‘मारो देव बापू सेवालाल’ हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. टी-सीरिजच्या बॅनरखाली ‘मारो देव बापू सेवालाल’ हे नवं गाणं रिलीज करण्यात आलं आहे. अमृता फडणवीस यांचं गाणं रिलीज होताच सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. टी-सीरीजने त्यांच्या अधिकृत यु-ट्युब चॅनलवर अमृता फडणवीस यांचं ‘मारो देव बापू सेवालाल’ रिलीज केले आहे. ‘मारो देव बापू सेवालाल’ या गाण्याचे गीतकार निलेश जालमकर असून, संगीत दिग्दर्शन कामोद सुभाष यांनी केले आहे. या गाण्याच्या व्हिडीओमध्ये अमृता फडणवीस बंजारा समाजाच्या पारंपरिक वेषामध्ये दिसत आहेत. त्यामुळे गाण्याला एक वेगळीच आकर्षक शैली मिळाली आहे. अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या गाण्याची आधीच घोषणा केली होती. ज्यासाठी त्यांनी एक पोस्ट शेअर करत म्हटलेले, ‘मी पुन्हा येत आहे.. आपली संस्कृती आणि धरोहर तुमच्यापर्यंत पोहचविण्यासाठी.. संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंती निमीत्ताने एक गीत घेऊन.. संपर्कात रहा’. या पोस्टनंतर काही तासांतच ‘मारो देव बापू सेवालाल’ हे गाणे रिलीज करण्यात आले. अमृता फडणवीस यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांची बरीच गाणे लोकप्रिय झाली आहेत. आता त्यांचे हे नवीन गाणे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अमृता फडणवीस बँकर असण्यासोबतच गायिका आणि सामाजिक कार्यकर्त्याही आहेत. त्या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रीय असतात. अमृता फडणवीस यांनी यापूर्वी अनेक भक्तीपर गीते गायली आहेत. त्यांनी गायलेले ‘शिव तांडव स्तोत्र’ देखील चांगलेच लोकप्रिय झाले होते. तसेच ‘मूड बना लिया’ हे गाणेही चांगलेच व्हायरल झाले होते.