Latest Marathi News
Ganesh J GIF

ब्रेकिंग! भाजपा एकनाथ शिंदेना महायुतीतून बाहेर काढणार?

शिंदेच्या या लोकप्रिय योजना फडवणीसांकडून बंद, शिंदेच्या मंत्र्याच्या फाईलही अडकल्या, शिंदे नाराज?

मुंबई – राज्यात महायुतीला मोठे यश मिळाल्यानंतर भाजपा महायुतीवर आपली पूर्णपणे पकड बनवण्यात यशस्वी झाला आहे. भाजपाकडे स्वतःचे १३२ आमदार आहेत. त्यामुळे त्यांना कोणाचीही गरज नाही. त्यामुळे भाजपला शिंदेंची गरज संपल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे भाजपाने शिंदेना मोठा दणका दिला आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना राज्यात अनेक लोकप्रिय योजना राबवण्यात आल्या होत्या. पण आता मिळालेल्या माहितीनुसार, तिजोरीवर आर्थिक ताण वाढल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोफत योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, मोफत तीर्थदर्शन योजना, आनंदाचा शिधा तसेच शिवभोजन थाळी थांबवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदेंच्या लोकप्रिय ठरलेल्या योजनांना देवेंद्र फडणवीसांनी ब्रेक दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? असा सवाल उपस्थित होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केलेली. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शन घडवले जात होते. मात्र आता राज्याच्या तिजोरीवरील वाढता भार कमी करण्यासाठी फडणवीस यांच्या सरकारकडून बंद करण्यात येणार आहे. ‘आनंदाचा शिधा’ ही देखील योजना थांबवण्याचा फडणवीस सरकार विचार करत आहेत. सरकारच्या तिजोरीवर आर्थिक ताण वाढल्यानं मोफत योजना थांबवण्याचा विचार सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे ‘शिवभोजन थाळी’ योजनाही बंद करण्यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी आपत्ती व्यवस्थापना वरूनही वगळण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारही आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये आहे. मात्र नगरविकास मंत्री असून एकनाथ शिंदेंना आपत्ती व्यवस्थापन समितीतून वगळले आहे.

शिंदे गटाच्या मंत्र्यांना पीए आणि ओएसडी मिळू शकलेले नाहीत. यामध्ये संजय राठोड, गुलाबराव पाटील, दादा भुसे, शंभुराज देसाई, प्रकाश आबिटकर यांचा समावेश आहे. त्यामुळे शिंदे गटाला तोंड दाबून बुक्क्यांचा मार सोसावा लागत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि पक्षाची कोंडी करुन शिंदेला बाजूला केले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!