
देशात तब्बल इतक्या राज्यात भाजपा आणि मित्रपक्षाची सत्ता
काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीकडे फक्त एवढीच राज्ये, देशातील तब्बल इतकी कोटी जनता भाजपासोबत, बघा यादी
दिल्ली – दिल्लीतील मोठ्या विजयानंतर देशाचा राजकीय नकाशा बदलला आहे. नव्या ताज्या निकालांनी देशाच्या १८ राज्यात आणि दोन केंद्र शासित प्रदेशात एनडीएचे सरकार आहे. २० पैकी सहा राज्यात मित्रपक्षाबरोबर भाजपाने सत्ता स्थापन केली आहे, तर १५ राज्यात भाजपाची एकहाती सत्ता आहे.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली, गेल्या वर्षी आठ राज्यांमध्ये निवडणुका लढवल्या गेल्या. यात आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, ओडिशा, जम्मू आणि काश्मीर, हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यातील विधानसभा निवडणुकीचा समावेश होता. तसेच भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा, हरियाणा आणि महाराष्ट्र या पाच राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली. तर काही राज्यात भाजपाची एकहाती सत्ता आहे. देशाची लोकसंख्या १४० कोटीच्या आसपास आहे. दिल्लीच्या विजयानंतर एनडीएचे शासन ९२ कोटी लोकांवर आहे. एनडीएच्याजवळ आता देशातील पाच मोठ्या राज्यांपैकी ( यूपी, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार आणि तामिळनाडु ) तीन राज्यात सरकार आहे. युपी आणि महाराष्ट्रात भाजपाचा स्वत:चा मुख्यमंत्री आहे. तर बिहारमध्ये भाजपाचे मित्र पक्ष जेडीयूचे नितीश कुमार यांच्या हाती सत्ता आहे. झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीची सरकार आहे. तर दक्षिण भारतातील पाच पैकी चार राज्यात इंडिया आघाडीचे सरकार आहे.केरळ, तेलंगाना, कर्नाटक आणि तामिळनाडुत इंडिया आघाडीचे सरकार आहे तर आंध्रप्रदेशात एनडीएची सरकार आहे. मणिपूरमध्ये भाजपाचे सरकार होते. पण तेथे आता राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
या राज्यात भाजप व मित्रपक्षाची सत्ता
उत्तर प्रदेश (भाजप)
महाराष्ट्र (भाजप)
मध्य प्रदेश (भाजप)
गुजरात (भाजप)
राजस्थान (भाजप)
ओडिशा (भाजप)
आसाम (भाजप)
छत्तीसगड (भाजप)
हरियाणा (भाजप)
दिल्ली (भाजप)
उत्तराखंड (भाजप)
त्रिपुरा (भाजप)
गोवा (भाजप)
अरुणाचल प्रदेश (भाजप)
आंध्र प्रदेश (टीडीपी)
बिहार (जेडीयू)
मेघालय (एनपीपी)
नागालँड (एनडीपीपी)
सिक्कीम (एसकेएम)
पुडुचेरी (AINRC)