Latest Marathi News
Ganesh J GIF

मोठी बातमी! दोन महिन्यात एकनाथ शिंदे महायुतीतून बाहेर पडणार?

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील जवळीकतेमुळे शिंदे अस्वस्थ, हे आहे महत्वाचे कारण?

मुंबई – सत्ता स्थापनेपासूनच महायुतीतली अंतर्गत धुसफूस सुरूच आहे. त्यातच पालकमंत्रिपदावरुनही नाराजीनाट्य रंगलंय. या पार्श्वभुमीवर एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची जवळीक वाढत असताना एकनाथ शिंदें मात्र महायुतीत एकटे पडल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र दिसून येत आहेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र वेगवेगळी कारणांनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसोबतच्या बैठका आणि कार्यक्रमांना गैरहजर राहत आहेत. सत्ता स्थापनेवेळी शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा सांगितला होता. पण अजित पवार यांनी फडणवीस यांना बिनशर्त पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांचा दबाव मोडून काढला होता. त्यातच एकनाथ शिंदे यांनी सुरु केलेल्या अनेक योजना अर्थ मंत्रालयाच्या शिफारशीनंतर बंद करण्यात आल्या. अर्थखाते अजित पवार यांच्याकडे आहे. अजित पवार यांच्यामुळे सत्तेतील वाटा कमी झाल्याची भावना शिंदे गटाच्या नेत्यात आहेत. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद अजूनही सुरु आहे. शिंदे गटाच्या मंत्र्यांचे पीए, ओसडींच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. तसेच मंत्र्याच्या अनेक फाईल रोखून धरल्या आहेत. एकनाथ शिंदेंकडून केलं जाणारं दबावाचं राजकारण पाहता मुख्यमंत्री फडणवीस हे अजित पवारांसोबत जुळवून घेण्याची शक्यता अधिक आहे. शिंदेंच्या वाढत्या दबावापुढे न झुकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवारांना सोबत घेऊन शिंदेंना दूर लोटणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मुंबई महापालिकेसाठी भाजपा एकनाथ शिंदे यांना दूर ठेवत राज ठाकरे यांना जवळ करण्याची शक्यता आहे. म्हणूनच फडणवीस ठाकरे यांची भेट झाली होती. म्हणूनच शिंदे महायुतीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा होत आहे.

अजित पवार यांना जवळ करणे व एकनाथ शिंदे यांना दूर करणे, ही फडणवीस यांची रणनीती दिसत आहे. याचमुळे शिंदे नाराज दिसत असून येत्या दोन महिन्यांत राज्यातील राजकारणात मोठे बदल होणार आहेत, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!