
राजकीय भूकंप! ठाकरेंनंतर आता शिंदेंची शिवसेनाही फुटणार?
शिंदेच्या सततच्या नाराजीनाट्यामुळे भाजपा संतप्त, शिंदे गटातील 'एवढे' आमदार भाजपात विलीन होणार?
मुंबई – गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राचे राजकारण सातत्याने बदलत आहे. राजकारणात काहीच अशक्य नाही हे सूत्र महाराष्ट्रात तंतोतंत लागू होत आहे. शिवसेना फुटल्याच्या घटनेला आला जवळपास तीन वर्ष होत आले आहेत. तोच आता भाजपा शिंदेंची शिवसेना फोडणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे कमालीचे अस्वस्थ झाले आहेत.
राज्यात तीन वर्षांपूर्वी मोठा राजकीय भूकंप झाला होता. २१जून २०२२ला शिवसेनेच्या इतिहासातील सर्वांत मोठं बंड झालं आणि शिवसेना फुटली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत सत्ता स्थापन केली. शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देखील देण्यात आले. पण आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत १३२ जागा जिंकलेला भाजपा मुख्यमंत्रीपद स्वतःकडे ठेवणार हे स्पष्ट होते. पण शिंदे यांनी नाराजीचा सुरू आवळला. त्यामुळे भाजपा कमालीचा संतप्त झाला. त्यामुळे शिंदे गटाचे बहुसंख्य आमदार उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपात विलीन होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. याबाबत सर्व तयारी झाली असून भाजपाच्या हायकमांडचा होकार आल्यानंतर शिवसेना फुटीचा नवीन अंक समोर येईल, असा दावा करण्यात येत आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे भविष्यात एकत्रित राहू शकत नाही. शिंदेंचं काम झालं आहे, त्यामुळे आता त्यांचं काम तमाम होणार आहे. हे आता सर्वांना दिसतंय. हे त्यांनाही माहिती आहे आणि त्यांच्या लोकांनाही माहीत आहे. त्यांचा पक्ष भाजपत विलीन होईल किंवा कोकणातील एका नेत्याच्या नेतृत्वात एक मोठा गट भाजपसोबत जाईल, हे मी स्टॅम्पपेपरवर लिहून सही करून देतो, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
उदय सामंत आणि फडणवीस यांचे चांगले संबंध आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उदय सामंत हे फडणवीस यांच्या सांगण्यावरून गुवाहाटीला गेले होते. तसेच उदय सामंत यांची उपमुख्यमंत्रीपदाची मनीषा लपून राहिलेली नाही. त्यामुळे उद्या भाजपाकडुन आदेश मिळताच सामंत आणि बहुसंख्य आमदार भाजपात विलीन जाण्यास नवल वाटायला नको इथवर चर्चा झालेली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे मात्र कमालीचे अस्वस्थ झाले आहेत.