
‘या’ महिला आमदाराच्या पतीला पोलीसंनी केली अटक
समन्स बजावूनही हजर न झाल्याने अटक, स्वतः ही भुषवले आहे 'हे' पद, अटकेमागे उद्धव ठाकरे कनेक्शन
कन्नड- माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना २०१४ मध्ये नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात एका हाॅटेलमध्ये पोलिस अधिकाऱ्याला चापट मारल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. हर्षवर्धन पाटील हे कन्नड विधानसभेचे माजी आमदार असून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे ते जावई आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे २०१४ मध्ये नागपूर दौऱ्यावर आले होते. तेव्हा एका हॉटेलमध्ये त्यांना भेटण्यासाठी हर्षवर्धन जाधव जात होते. तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या शासकीय स्वीय सहाय्यकाला त्यांनी शिवीगाळ करत मारहाण केली होती. त्यामुळे या प्रकरणी त्यांच्यावर सोनेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारी कामात अडथळा आणण्याच्या प्रकरणावरुन दाखल केला होता. या प्रकरणी न्यायालयात दोषारोपत्र दाखल झाले होते. खटला सुरु असताना न्यायधीशांनी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने त्यांना वारंवार समन्स बजावले होते. मात्र, जाधव न्यायालयात उपस्थित राहत नव्हते. त्यामुळे न्यायालयाने गेल्या आठवड्यात हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध अजामीनपात्र नोटीस बजावली होती. अखेर त्यांना सोमवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. यापूर्वी देखील हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणात जिल्हा न्यायालयाने एका वर्षाची सक्तमजुरी व १० हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली होती. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. दरम्यान नागपूर पोलिसांनी अटक केल्यानंतर छातीत दुखू लागल्याने सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
हर्षवर्धन जाधव हे कन्नड विधानसभेचे माजी आमदार आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे, हर्षवर्धन जाधव यांचा त्यांच्या पत्नी संजना जाधव यांनी पराभव केला आहे.