Latest Marathi News
Ganesh J GIF

मुलीची छेड काढली, जाब विचारल्याने आई वडिलांना दांडक्याने मारहाण

छत्रपती संभाजीनगरमध्ये रोडरोमिओची दादागिरी, व्हिडिओ व्हायरल, महाराष्ट्रात चाललय काय?

छत्रपती संभाजीनगर – मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला जाब विचारायला गेलेल्या आईला रोड रोमियोनं बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी, आई, वडील, भाऊ व बहिणीसह जोगेश्वरी येथे भाड्याच्या घरात राहतात. आई, वडील खासगी नोकरी करतात. मंगळवारी नववीच्या वर्गात शिक्षण घेणारी अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी येत होती. त्यावेळी आरोपी नीलेश दुबिले, ऋषीकेश दुबिले, प्रतीक राजपूत यांनी तिला अश्लील हातवारे करीत तिचा पाठलाग केला. मुलीने घरी आल्यानंतर पालकांना हा प्रकार सांगितला. तिची आई घराबाहेर आली असता तिघेही पळून गेले. दुस-या दिवशी मुलगी घराचा ओटा झाडत असताना निलेश दुबिले, ऋषिकेष दुबिले, प्रतीक राजुपत हे तिला पाहून आवाज देऊन तिच्या मनात लज्जा वाटेल असे कृत्य केले. याबाबत त्यांना विचारणा केली असता, तिघांनी शिवीगाळ करत लाकडी दांड्याने तसेच जे हातात येईल त्याने पीडित मुलीच्या आईला छातीवर लाथाने व डोक्यात दगड मारून जखमी केले. वडिलांनाही ते तिघे मारत असताना तेथे प्रविण डिगंबर काजळे, कृष्णा काजळे, सतिश काजळे हे भांडण सोडवण्यास आले, तेव्हा त्या तिघांनाही मारहाण करून शिवीगाळ केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी निलेश दुबिले, ऋशिकेष दुबिले, प्रतीक राजुपत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही मारहाणीची घटना घडत असताना लोकांची मोठी गर्दी झाली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!