
महिलादिनीच पुण्यात महिलांसमोर तरुणाचे अश्लील चाळे
तरुणांच्या कृत्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, पुण्यात गुन्हेगारांचे राज्य, पोलिसांचा धाक संपला?
पुणे – पुणे एकेकाळी विद्येचे माहेरघर होते. पण आता पुण्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत चालली आहे. कारण रोज पुण्यात काही ना काही घटना घडत आहेत. आता पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पुण्यात एका BMW चालक तरूणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या तरूणांनी फूटपाथवर लघवी करत अश्लील कृत्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गाडीत बसलेला हा चालक मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत होता. येरवडा भागांमध्ये शास्त्रीनगर चौकात स्त्रियांच्या समोर त्याने अश्लील चाळे केले. हा आणि आतमधील त्याचा मित्र दोघेही दारू प्यालेले होते. अश्लील चाळे करुन झाल्यावर दोघे फुल स्पीडमध्ये गाडी चालवत वाघोलीच्या दिशेने गेले. पुणे नगर रोडवरील शास्त्रीनगर चौकात ही घटना घडली. दोन्ही व्यक्ती BMW कारमध्य बसल्या होत्या. या कारचा नंबर MH-12 RF8419 आहे.महत्वाचे म्हणजे आज जागतिक महिला दिन असून अशा प्रकाराची घटना घडल्याने पुन्हा पुण्यात कायद्याचा धाक राहिला आहे का? अशी चर्चा रंगली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता सर्व बाजुनी टीका होत आहे. या बड्या बापाच्या पोरांवर कारवाई करण्याची मागणी सोशल मीडियावर होत आहे.
पोलिसांकडून तरूणावर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच येरवडा पोलिसांकडून तरूणांसह कारचा शोध सुरू आहे. या प्रकरणानंतर पुणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.