Latest Marathi News
Ganesh J GIF

जनलोक प्रतिष्ठानच्या वतीने महावीर निवासी मूकबधिर विद्यालयाला पिठाची गिरणी भेट, सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी स्तुत्य उपक्रम

उरुळी कांचन (प्रतिनिधी) : सामाजिक बांधिलकी जपत जनलोक प्रतिष्ठानच्या वतीने उरुळी कांचन येथील महावीर निवासी मूकबधिर विद्यालयाला पिठाची गिरणी भेट देण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यालयाच्या दैनंदिन कामकाजात मदत होणार असून, विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी प्रतिष्ठानने उचललेले हे पाऊल कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जनलोक प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा सविताताई कांचन यांनी केले. समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देणे, तसेच शैक्षणिक संस्थांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, हा सामाजिक उपक्रमांचा महत्त्वाचा उद्देश आहे. याच भावनेतून जनलोक प्रतिष्ठानने महावीर निवासी मूकबधिर विद्यालयाला पिठाची गिरणी भेट देऊन सामाजिक उत्तरदायित्व जपले आहे.

या उपक्रमातून सामाजिक कार्याप्रती असलेली तळमळ आणि विद्यार्थ्यांविषयीची आपुलकी अधोरेखित होत असल्याचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्मिता सपार यांनी सांगितले. या वेळी जनलोक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुनंदा कदम, उपाध्यक्षा सविताताई कांचन, आबासाहेब रुपनर, काशिनाथ चव्हाण, रेखा चौधरी, सरस्वती लावंड, रूपाली कांचन, पुष्पा कांचन, गोपाळ सावरकर, रामहरी लावंड, महावीर निवासी मूकबधिर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्मिता सपार, बी. एन. भालेराव सर, कविता पवार, प्रियंका टिळेकर, मीनाक्षी वासनिक, अमोल भोसले, सुनिल तुपे यांच्यासह विद्यालयातील कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनलोक प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. अशा सामाजिक उपक्रमांमुळे गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा मिळण्याबरोबरच सामाजिक संस्था आणि शैक्षणिक संस्थांमधील सहकार्य अधिक दृढ होण्यास मदत होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!