बाप्पाच्या दर्शनाला येताना अजित पवार पैसे विसरतात तेंव्हा…
अजित पवारांचा हा फोटो सोशल मिडीयावर करतोय धुम एकदा बघाच
पुणे दि ९ (प्रतिनिधी)- आज गणरायाला सर्वत्र निरोप देण्यात येत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आज पुण्यातील मानाच्या गणपतीचे दर्शन घेत आहे. त्यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह दगडू शेठ हलवाईचे दर्शन घेतले. पण या दरम्यान एक मजेशीर घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
त्याचे झाले असे की, अजित पवार गणपतीच्या दर्शनासाठी येत असताना मंदिरात आल्यावर त्यांनी दगडूशेठचे दर्शन घेतले त्यानंतर त्यांनी दान टाकण्यासाठी त्यांचे खिसे चाचपले, पण त्यांच्या खिशात पैसेच नव्हते. गणपतीच्या दर्शनाला येताला पैसेच विसरले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या सुरक्षारक्षकाकडून पैसे घेतले आणि गणपतीची पुजा केली. त्यांचा सुरक्षारक्षकाकडून पैसे घेतानाचा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. दहा दिवसानंतर आज गणरायाला निरोप देण्यात येत आहे. पण अजित पवारांच्या दर्शनापेक्षा सुरक्षा रक्षकाकडून पैसे घेतल्याचा फोटो व्हायरल होत आहे.
गणेश विसर्जनाबद्दल बोलताना अजित पवार यांनी विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.”सगळ्या गणेश भक्तांनी काळजी घ्यावी कुठला ही अनुचित प्रकार घडू नये. पोलिस त्यांचे काम करतीलच पण गणेश मंडळांनी देखील काळजी घ्यायला हवी,” असे अजित पवार म्हणाले आहेत.