Just another WordPress site

अमरावतीतील ‘त्या’ लव्ह जिहाद प्रकरणी नवनीत राणा अडचणीत

अमरावतीतील गायब मुलीचा नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप

अमरावती दि ९ (प्रतिनिधी) – अमरावतीच्या लव्ह जिहाद आरोप प्रकरणाला त्या मुलीच्या जवाबानंतर वेगळचं वळण मिळाल आहे. अमरावतीतले लव्ह जिहाद प्रकरण खासदार नवनीत राणा यांनी पोलीस स्टेशनमध्ये राडा घातल्याने चांगलेच चर्चेत आले आहे. नवनीत राणा यांनी माझी बदनामी केली असा आरोप त्या मुलीने केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या जबाबात या तरुणीने मला कोणीही पळवुन नेलं नव्हतं. मी बाहेर शिक्षणासाठी जात होते. नवनीत राणा बोलत आहे ते पूर्ण खोट आहे. यामुळे माझी खूप बदनामी होत आहे. अमरावतीचं संपूर्ण प्रकरण लव्ह जिहादच असल्याचे सांगत नवनीत राणा यांनी पोलीसांसमोर राडा घातला होता.पोलीस तपास चालू असल्याचे सांगत असतानाही राणा यांनी पोलीसांवर गंभीर आरोप केले होते. यादरम्यान पोलीस आणि खासदार राणा यांच्यात जोरदार धुमश्चक्री उडाली होती. शहरातील आंतरधर्मीय विवाह व लव्ह जिहाद प्रकरणातील मुलाशी थोडा कठोर व्यवहार करा, असे सांगण्यासाठी फोन केल्यानंतर मनीष ठाकरे यांनी आपला कॉल रेकॉर्ड केला. त्याबाबत जाब विचारण्यासाठी आपण पोलीस ठाण्यात दाखल झाल्याचे राणा म्हणाल्या होत्या.पण संपुर्ण प्रकरणामुळे नवनीत राणा चांगल्याच तोंडघशी पडल्या आहेत.

GIF Advt

अमरावती इथून गायब झालेली तरुणी सातारा इथं सापडली असून पोलिसांनी त्या तरुणीची चौकशी करुन तिला तिच्या कुटुंबियांच्या स्वाधिन करण्यात आलं आहे. दोन दिवस या संपूर्ण प्रकरणाची राज्यात जोरदार चर्चा होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!