Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात पोलिसाचीच महिलेकडे शरीरसुखाची मागणी

पोलीसांकडूनच महिलेची छेड, सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद, महिलेचा पोलीसांवर 'हा' आरोप

पुणे – पुण्यातील उरळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या ठिकाणी एका पोलीस कर्मचाऱ्याने वर्दीचा धाक दाखवत मेसचे डब्बे पोहोचवणाऱ्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

गणेश रतन दाभाडे असे त्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलीस हा दारुच्या नशेत एका हॉटेलवर गेला होता. यावेळी त्याने महिलेशी जवळीक साधत शरीरसुखाची मागणी केली. पण महिलेने विरोध करताच त्याने आपण हॉटेलमध्ये छापा टाकायला आल्याचा बनाव केला. यावेळी आरोपी पोलिसाच्या पायात बूट देखील नव्हते, तसेच अंगावर वर्दी देखील नव्हती. त्याने जॅकेटच्या आतमध्ये वर्दी लपवली होती. यावरून पीडित महिलेने पोलिसाला सवाल विचारला आहे. तुम्ही छापा टाकायला आला आहात तर तुमचे पोलीस पथक कुठे आहे? दारुच्या नशेत तुम्ही कशी छापेमारी करू शकता? असा प्रश्नाचा भडिमार केल्यावर आरोपी पोलिसाला काहीच उत्तर देता आलं नाही. हा सगळा प्रकार पीडित महिलेनं स्वत: आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आहे. याबाबतचा व्हिडीओ आता समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ठाकरे गटाच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील हा व्हिडीओ एक्स अकाऊंटवर पोस्ट केला आहे. यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टॅग करत, आरोपी पोलीसावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीसच जर असा प्रकार करु लागले तर महिला सुरक्षित कशा राहतील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मेस चालवणाऱ्या महिलेची पोलीसानेच छेड काढल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही. मात्र पोलिसावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. पण पोलीस तक्रार घेत नसल्याचा आरोप महिलेने केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!