Latest Marathi News
Ganesh J GIF

मला ‘राज्यपाल’ करा नाहीतर बंद बॅंडवाल्यासारखी अवस्था होईल

भाजपाच्या या नेत्याची भाजपाकडे मोठी मागणी, राजकारणात खळबळ, भाजपात नाराजीचे वारे?

सांगली – आमदार गोपीचंद पडळकर यांचा सांगलीतील विट्यामध्ये जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभ प्रसंगी विधान परिषदेमधील आमदार सदाभाऊ खोत यांनी जोरदार बॅटिंग करत भाजपाकडे मोठी मागणी केली आहे.

खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र मंजूर करण्यात पुढाकार घेतल्याबद्दल आणि जत विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय संपादन केल्याबद्दल विट्यात पडळकर यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी खोत बोलत होते. ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक दिवस गोपीचंद पडळकर यांना नक्की मंत्री करतील असा मला विश्वास आहे. कोणी कितीही देव पाण्यात ठेऊ दे, देवा भाऊ एक दिवस गोपीचंद पडळकर यांना मंत्री करणार. गोपीचंद मंत्री व्हा, देशमुख आमदार, खासदार व्हा, मात्र, आम्हाला राज्यपाल करा. नाही तर आमची अवस्था वाजंत्री वाजवणाऱ्यासारखी व्हायची असे म्हणताच सभेत हशा पिकला. यावेळी त्यांनी लग्नात बँडवाला गाणी वाजवत असतो. लोक लोक म्हणतात वन्स मोअर मग ते पण जोरात वाजवतं. वन्स मोअर म्हणाणारे पहिल्या पंगतीला आणि वाजवणार बिड्या फुकत कोपऱ्यात त्याला कोण जेव म्हणत नाही, असे म्हणत खोत यांनी कार्यक्रमात रंगत आणली. मात्र या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आल्याने, सदाभाऊ खोत यांनी लगेच स्पष्टीकरण देत ही संपूर्ण गोष्ट मिश्किल असल्याचं सांगितलं. ‘मी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी चळवळीत कार्यरत आहे. माझ्या भाषेचा बाज गावगड्याचा आहे. माझी भाषा शैली रानडी असली तरी ती मनापासूनची असते. सभेला आलेले शेतमजूर, बारा बलुतेदार हसावेत, यासाठी मी अशा शैलीत बोलतो,’ असं ते म्हणाले.

जयंतराव पाटील यांचे देखील सध्या तळ्यात मळ्यात सुरू आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, नगरपंचायत निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकवायचा आहे. यासाठी तयारीला लागा असे आवाहन पडळकर यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!