
सिंहगडावर टवाळखोर तरुणांचे विदेशी पर्यटकासोबत अश्लील कृत्य
परदेशी पर्यटकाला शिकवल्या घाणेरड्या शिव्या, व्हिडिओ जोरदार व्हायरल, शिवप्रेमी संतप्त
पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यात अनेक गडकिल्ले ताब्यात घेत हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यातील सिंहगड पूर्वीचा कोंढाणा किल्ला तर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या बलिदानाची कहानी सांगणारा स्तंभ आहे. पण त्याच किल्ल्यावर एक संतापजनक एन संतापजनक प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने प्रेरित होऊन अनेक परदेशी पर्यटक महाराष्ट्रातील गड-किल्ले पाहण्यासाठी येतात. परंतु, अशा पाहुण्यांसोबत स्थानिकांनी अश्लील वागणूक केल्याचे समोर आले आहे. विदेशी पर्यटक सिंहगड किल्ला सर करत होता. त्यावेळी त्याला काही महाराष्ट्रतील तरुण भेटले. याप्रसंगी आपण कुठून आलो आहेत, कसे आलो आहोत? हा मूळ परिचय सोडून त्या तरुणांनी विदेशी पर्यटकाला अश्लील भाषेत शिविगाळ करण्यास सांगितले. त्यांच्या सांगण्यावरून पर्यटकाने शिविगाळ केली. मात्र शिवीगाळ करत असताना तरूणांनी हसण्यास सुरूवात केली. त्यामुळे पर्यटकाने तेथून काढता पाय घेतला. तरुणांनी भलताच प्रकार केला. या टोळक्यातील तरुणांनी परदेशी पर्यटक पाहुण्याला काही अश्लील मराठी शब्द सांगून त्या भाषेत शिवीगाळ करण्यास भाग पाडले. सुरुवातीला त्यांच्या सांगण्यावरून त्याची नकळत शिवीगाळ केली. मात्र, आपण काहीतरी चुकीचं बोलत आहोत, याची जाणीव त्या पर्यटकाला झाली. या प्रकारानंतर आता येथे पुन्हा येणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. टवाळखोर तरुणांनी परदेशी पर्यटकाला हीन दर्जाची वागणूक दिल्याप्रकरणी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांनी हा व्हि़डीओ एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला. व्हिडीओत दिसणाऱ्या,टवाळकी करणाऱ्या तरुणांवर कारवाई होईल का? हे पाहणं आता महत्त्वाचा असणार आहे.