Latest Marathi News
Ganesh J GIF

कुख्यात गुंड टिपू पठाणची पुणे पोलीसांनी काढली धिंड

धिंड काढल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, या कारणामुळे झाली अटक, कोण आहे टिपू पठाण?

पुणे – हडपसर भागातील सय्यदनगर भागात दहशत माजविणारा गुंड टिपू पठाण याच्यासह साथीदारांची पोलिसांनी धिंड काढली. टिपू पठाण आणि साथीदाराविरुद्ध एका महिलेची जमीन बळकाविल्याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी काढलेल्या धिंडचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सय्यदनगर भागात रिझवान उर्फ टिपू पठाणची दहशत आहे. पठाणे याने एका कार्यक्रमात नोटांची उधळण केल्याची घटना नुकतीच घडली होती. समाज माध्यमात चित्रफीत प्रसारित केली होती. समाज माध्यमात चित्रफीत प्रसारित केल्याप्रकरणी पठाणसह साथीदारांविरुद्ध पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पठाण आणि साथीदारांनी एका महिलेची जमीन बळकाविल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. संबंधित महिलेने काळेपडळ पोलिसांकडे तक्रार दिली होती. याप्रकरणी रिझवान उर्फ टिपू सत्तार पठाण, सद्दाम सलीम पठाण, एजाज युसूफ इनामदार, नदीम बाबर खान यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर, पोलिसांनी शनिवारी सायंकाळी पठाण याच्यासह साथीदारांची सय्यदनगर भागात धिंड काढली. पोलिस उपायुक्त डाॅ.राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काळेपडळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील आणि पथकाने ही कारवाई केली. पठाण याने नागरिकांना धमकावून खंडणी उकळणे, तसेच जमीन बळकावल्याचे प्रकार केल्यास तक्रार करावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक पाटील यांनी केले आहे.

टिपू पठाण टोळीची हडपसरमधील सय्यदनगर परिसरात दहशत असून यापूर्वी खुनाचा प्रयत्न, हाणामारी, दहशत माजविणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल झाले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!