Latest Marathi News
Ganesh J GIF

महायुतीत बेदिली? एकनाथ शिंदे अजित पवारांवर नाराज

एकनाथ शिंदेंची अर्थखात्याबाबत थेट अमित शाहांकडे तक्रार?, शिंदे गटातही धुसफूस?

मुंबई – राज्यात महायुतीचे सरकार असून एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्रिपद आहेत. पण तिजोरीच्या चाव्या अजित पवार यांच्याकडे असल्याने शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चा होत आहेत. त्यातच आता हा वाद आता थेट अमित शहांसमोर गेल्याने महायुतीमधील बेदिली समोर आली आहे.

अर्थखात्याकडून अपेक्षित निधी मिळत नसल्याने तसेच रायगडच्या पालकमंत्रिपदावरून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे. याबाबत त्यांनी अमित शहांकडे तक्रार केल्याची देखील माहिती आहे. मात्र,यावर मार्ग निघत नसल्याने ते आज पुन्हा अमित शाहांच्या भेटीसाठी गेल्याचे सांगितले जाते आहे. विशेष म्हणजे अमित शहा हे आज भोपळला रवाना होणार आहेत. ते रवाना होण्याची पूर्वी शिंदेंनी शहा यांची भेट घेतली. अर्थ खात्याकडून फाईली मंजूर होत नाहीत, अशी तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दोन दिवसांपूर्वीच प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे पगार रखडल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. अर्थ खात्याने अपुरा निधी दिल्याने ही समस्या उद्भवली होती. अखेरीस एकनाथ शिंदे यांना स्वतः वित्त सचिवांना फोन करून मध्यस्थी करावी लागली. या घटनेने महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील कुरघोडी उघड झाली. आता शिंदे यांनी थेट अमित शहा यांच्याकडे तक्रार केल्याने हा वाद अधिक तीव्र झाला आहे. दरम्यान शिंदे गटाचे नेते संजय राठोड यांनी मात्र आपल्या खात्याला निधी मिळत असल्याचे सांगत शिंदे यांनाच कोंडीत पकडले आहे.

महाविकास आघाडी सरकार असताना अजित पवार निधी देत नसल्याचा आरोप करत एकनाथ शिंदे आणि आमदारांनी बंड करत भाजपासोबत युती स्थापन केली होती. पण पुढल्या वर्षभरातच अजित पवारही सत्तेत सामील झाल्याने शिंदे गटाची अस्वस्थता कायम आहे. आता अमित शहा यावर काय तोडगा काढणार हे पहावे महत्वाचे ठरणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!