Latest Marathi News
Ganesh J GIF

कुख्यात गुंड निलेश घायवळला मारहाणीचा दुसरा व्हिडिओ समोर

हल्ला करणाऱ्या सागरचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी, हल्ल्याच्या कारणाचा शोध, अचानक आला आणि कानाखाली....

धाराशिव – काही दिवसांपूर्वी धारशिव जिल्ह्यातील एका कुस्ती स्पर्धेवेळी पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याला मारहाण झाली होती. भूम तालुक्यातील आंदरूड गावात ही घटना घडली होती. आता त्या मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे.

निलेश घायवळला मारहाण करणाऱ्या तरुणाचे नाव सागर मोहोळकर असल्याचे समोर आले होते. सागर मोहोळकर हा पैलवान असून तोही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. तो अहिल्यानगर जिल्ह्यातील नानज गावचा रहिवासी आहे. व्हायरल होत असलेल्या आणखी एक व्हिडिओत दिसत आहे की, निलेश घायवळ हा आयोजकांसोबत मैदानात चालताना दिसत आहेत. त्यांच्यापुढे हलगी वाजवणारे चालत आहेत. मैदानात फेरी मारत असताना अचानक काळ्या रंगाच्या शर्ट घातलेला सागर मोहोळकर हा निलेश घायवळच्या दिशेने चालत येतो आणि काही समजण्याच्या आता तो निलेश घायवळच्या कानाखाली जोरात मारतो. सागर मोहोळकरने घायवळच्या कानाखाली मारल्यानंतर थोड्यावेळ मैदानात शांतता पसरते. त्यानंतर सागर पुन्हा एकदा हल्ला करणार इतक्यात निलेश घायवळ याच्या टोळीतील लोकांनी सागर मोहोळकर याला पकडून चांगलाच चोप दिला. मात्र, पुण्यातील गुन्हेगारी विश्वात दबदबा असलेल्या निलेश घायवळला अशाप्रकारे मारहाण झाल्यामुळे याची राज्यभर चर्चा होत आहे. सागरने निलेश घायवळवर हल्ला का केला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यामागे काही जुनं वैर होतं की आणखी काही कारण? याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान निलेश घायवाल हा एक कुख्यात गुंड आहे ज्याच्याविरुद्ध खून, खंडणी, दरोडा आणि दंगल यासह अनेक गुन्हे दाखल आहेत.

वाशी पोलिसांनी या घटनेची स्वतःहून दखल घेत सागर मोहोळकरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याला ताब्यात घेण्यात आलं असून, सखोल चौकशी सुरू आहे. तपासात समोर आलं की, सागरचा गुन्हेगारी इतिहास आहे, त्याच्यावर दोन खुनाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!