
धनंजय मुंडे यांनीच वाल्मिक कराडचा एन्काऊंटरचा प्रयत्न केला
धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, निलंबित पोलिसाचा धक्कादायक गाैप्यस्फोट, महाराष्ट्र पोलिसांना दिले ओपन चॅलेंज
बीड – संतोष देशमुख हत्याकांडानंतर राज्यात बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कृत्यांची चर्चा रोजच होत आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटनांनी राजकारणही ढवळून निघाले आहे. यातच आता निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबतीत अतिशय धक्कादायक दावा केला आहे. त्यामुळे मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी केला होता, असा खळबजनक दावा रणजीत कासले यांनी केला आहे. कासले यांनी नवा व्हिडिओ फेसबूकवर पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्यांनी केलेल्या दाव्याने बीड आणि राज्यात खळबळ उडाली आहे. काल कासले यांनी कराडचा खात्मा करण्यासाठी आपल्याला ५० कोटींची आॅफर आल्याचा दावा केला होता. पण ही आॅफर कोणी दिली होती. याची माहीती त्यांनी दिली नव्हती. पण आता त्यांनी ही आॅफर धनंजय मुंडे यांनी दिली असल्याचा दावा केला आहे. धनंजय मुंडे यांनीच वाल्मिक कराडचा एन्काऊंटरचा प्रयत्न केला होता. कारण त्यांन ते नको होते. वाल्मिक कराड त्यांचे अंडी पिल्ली बाहेर काढणार होते. त्यामुळे ते खुनाचा आरोपात सहरोपी झाले असते, असा दावा वादग्रस्त निलंबित पीएसआय अधिकारी रणजित कासले यांनी केला आहे. तसेच धनंजय मुंडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहआरोपी होणार नाहीत, कारण अनेक पुरावे दाबले गेले आहेत, असा आरोपही कासले यांनी केला आहे. महाराष्ट्र पोलिसांनी मला पकडून दाखवावे. मी त्यांना ओपन चॅलेंज देतो. त्यांनी कितीही टीम पाठवू द्या. मी रोज स्टेट बदलणार, सीम कार्ड बदलणार,” असंही कासले म्हणाले आहेत.
रणजित कासले हे सध्या निलंबित असून त्यांच्यासंदर्भात खात्याअंतर्गत चौकशी सुरु आहे. सुरत येथील एका व्यापाऱ्याच्या आर्थिक फसवणूक प्रकरणाचा तपास कासले करत होते. तपासादरम्यान आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले आहे.