
ठाकरे गटाला मोठा धक्का! महिला नेत्याचा पक्षाला जय महाराष्ट्र*
महापालिका निवडणूकीच्यासमोर ठाकरे अडचणीत, कारणही समोर, मातोश्रीवर तोडगा निघणार?
मुंबई – विधानसभा निवडणूकीतील निराशाजनक कामगिरीनंतर उद्धव ठाकरे यांना एकामागून एक धक्के बसत आहे. पक्षातील अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी बाहेर पडत शिंदे गटाची साथ निवडली आहे. असे असताना आता मुंबईतील ठाकरे गटाच्या नगरसेवक तेजस्वी घोसाळकर यांनी आपल्या सर्व पदाचा राजीनामा दिला आहे.
तेजस्वी घोसाळकर या माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सून, तर काही काळापूर्वी हत्या झालेले ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत. स्थानिक नेतृत्वावर नाराज असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे उत्तर मुंबईत ठाकरे गटाला मोठा फटका बसला आहे. तेजस्वी घोसाळकर या दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत. अभिषेक यांची काही महिन्यांपूर्वी फेसबुक लाईव्हदरम्यान मॉरिस नरोन्हा या व्यक्तीने गोळ्या झाडून हत्या केली होती. घोसळकर यांनी आपण महिला – दहिसर विधानसभा प्रमुख या पदावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. तसेच यासाठी त्यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. पक्षाच्या कार्यपद्धतीशी एकनिष्ठ राहून कार्य करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी पक्षप्रमुख व आपले मन:पूर्वक आभार मानते, असे त्यांनी राजीनाम्यात म्हटले आहे.तेजस्वी घोसाळकर यांनी सोमवारी रात्री आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांची समजूत काढण्यासाठी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्धव सेनेचे उपनेते आणि माजी आमदार डॉ.विनोद घोसाळकर यांच्या बरोबर तेजस्वी घोसाळकर यांना मातोश्रीवर बोलावण्यात आले आहे. गेल्या महिन्यामध्ये तेजस्वी घोसाळकर यांना जीवे मारण्याची धमकी व्हॉट्सअप ग्रुपवर आलेली होती. तेजस्वी घोसाळकर यांच्या नावाने व्हॉट्सअप ग्रुपवर ‘लालचंद इनको देखकर सुधर जा, इसकी बिवी को मत मरवा देना लालचंद’, अशा आशयाचा मेसेज करण्यात आला होता. स्थानिक विभाग प्रमुख आणि विभाग संघटक यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत तेजस्वी घोसाळकर यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. तेजस्वी घोसाळकर यांनी विभाग प्रमुख आणि विभाग संघटक यांच्याबद्दल अनेक वेळा नाराजी व्यक्त करून सुद्धा पक्षाकडून दखल न घेतल्यामुळे राजीनामा दिल्याची माहिती आहे. घोसाळकर या शिंदे गटात जातील, अशी अटकळ बांधली जात होती, पण आता त्या भाजपात जाणार असल्याचे सांगितले जात आहे. महापालिका निवडणूका जवळ आल्याने घोसाळकर यांचा राजीनामा ठाकरेंची डोकेदुखी वाढवणारा आहे.
लोकसभेला तिकीट न मिळाल्यानं त्या नाराज होत्या. त्यांनी अखेर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिला आहे. मातोश्रीतील बैठकीनंतर त्या राजीनामा मागे घेणार की आपला निर्णय कायम ठेवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.