Latest Marathi News
Ganesh J GIF

तुला मुलगा होत नाही तर आमच्या ये, हगवणे कुटुंबीयांचा प्रताप

वैष्णवी प्रमाणेच मयुरीलाही हगवणे कुटुंबीयांची मारहाण, सारऱ्याचे सुनेसोबत अश्लील कृत्य, आईचे पत्र व्हायरल

पुणे – वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आता नवनवे खुलासे होत आहेत. हगवणे कुटुंबीय आपल्या सुनेसोबत ज्या पद्धतीने वागत ते अतिशय चीड आणणारे होते. आता त्याचबरोबर हगवणे कुटुंबीयांनी आपली मोठी सुन मयुरी हगवणे हिचा देखील छळ केल्याचे समोर आले आहे. मयुरीच्या आईने या प्रकरणी राज्य महिला आयोगाला पत्रही लिहिले होते. पण महिला आयोगाने मात्र हारिकिरी केल्याचे समोर आले आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मयुरीच्या आईने लिहिलेल्या पत्राचे फोटो आणि मयुरीला मारहाण झाल्याचे फोटो शेअर केले आहेत. पत्रातील मजकूर अतिशय अस्वस्थ करणारा आहे. वैष्णवी प्रमाणेच मोठी सुन असलेल्या मयुरीलाही फॉर्च्युनर गाडी आणि पैशांची मागणी केली जात होती. त्याचबरोबर सासरे राजेंद्र हगवणे आणि नणंद करिश्मा यांनी मयुरीला मारहाण देखील केल्याचे समोर आले आहे. मयुरीच्या आईने पत्रात धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांनी लिहिले आहे की, ‘६ नोव्हेंबर २०२४ रोजी तिचे पती घरी नसताना सासू, सासरे, दिर आणि नणंद यांनी तिला मारहाण केली. तिचे कपडे फाडले, तिच्या छातीला सासऱ्याने हात लावला, आणि दिराने मुलीच्या अवघड जागी लाथ मारली. तुला मुलगा होत नाही तर आमच्या ये, या भाषेत मुलीला शिवीगाळ केली. हे सर्व होत असताना मुलीने मोबाईलमध्ये रेकॉर्डींग सुरु होती. हे कळताच तिचा दिर शशांक राजेंद्र हगवणे यांनी तिचा मोबाईल हिसकावून पळ काढला. मुलीने त्याच परिस्थितीत त्याचा पाठलाग केला. ही घटना सदर ठिकाणच्या सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्डसुद्धा झाली आहे. तिच्याकडे कोणालाही संपर्क करण्यासाठी साधन नसल्यामुळे हतबल परिस्थितीमध्ये पोलिसांत तक्रार दाखल करु शकत नव्हती. याचा फायदा घेत तिच्या सासू आणि नणंद यांनी पोलीस स्टेशनला मुलीची तक्रार दिली. इतर अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या अर्जात नमूद करता येणार नाही’, असं मयुरीच्या आईने पत्रात म्हटलं आहे.

अंजली दमानिया यांनी या प्रकरणी राज्य महिला आयोगाला प्रश्न विचारले आहेत. ‘महिला आयोग यावर काय स्पष्टीकरण देणार का? वैष्णवीचा जीव वाचला नसता का? वैष्णवीची जाऊ, मयूरी, हिने महिला आयोगाला ईमेल करून तिला मारहाण केली. तिच्या सासऱ्यांनी छाती जवळ हात लावून कपडे फाडले. शिवीगाळ केली, ह्याचे पुरावे, FIR, फोटो आणि तिच्या आईने लिहिलेली चिठ्ठी पाठवली. ती चिठ्ठी सुद्धा मी जोडत आहे. आमच्या मागे मोठा राजकीय पाठिंबा आहे असा त्या चिठ्ठीमधे उल्लेख आहे. महिला आयोगाने यावर कारवाई का नाही केली? याचं उत्तर हवं आहे. अशा शब्दांत अंजली दमानिया यांनी जाब विचारला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!