
आनंदवार्ता! मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात दाखल
तब्बल १२ दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल, शेतकरी आनंदी! पुढील तीन चार दिवस राज्यात मुसळधार
मुंबई – गेल्या आठ दिवसापासून महाराष्ट्रातील हवामानात बदल झाला आहे. राज्यात सगळीकडे मुसळधार पाऊस पडत आहे. कितीतरी वर्षातून पहिल्यांदाच मे महिन्यातच पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यातच आता पंधरा दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे ऐन मे महिन्यात नदी नाले प्रवाहित झाले आहेत. दरम्यान रविवारी सकाळी 11 च्या सुमारास मान्सून महाराष्ट्रातील तळकोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. म्हणजे मान्सून रविवारीच महाराष्ट्राच्या तळ कोकणासह काही भागात दाखल झाला आहे. तसेच तो पश्चिममध्य आणि उत्तर बंगालच्या उपसागराच्या काही भागात आणि मिझोरामच्या काही भागात, मणिपूर आणि नागालँडच्या काही भागात पुढे सरकला आहे. रविवारी सकाळीच मान्सून तळकोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत आला मान्सूनचा वेग पाहता ती अवघ्या तीन दिवसात पुणे,मुंबईसह अवघे राज्य व्यापेल असा अंदाज आहे. दरवर्षी तो तळकोकणात ५ ते ६ जून पुण्यात ८ ते १० जून ,मुंबईत १२ जून तर संपूर्ण राज्यात १५ ते २० जूनपर्यंत येतो मात्र यंदा तो प्रचंड वेगाने अवघ्या १२ तासात केरळ ते गोवा मार्गे महाराष्ट्रात दाखल झाला.किमान १० ते १२ दिवस आधीच तो तळकोकणात आला आहे. शनिवारी केरळात पोहोचलेल्या मान्सूनला, महाराष्ट्रात आगमनासाठी एक ते दोन दिवस लागतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र मात्र यंदा हवामानातील पोषक स्थितीमुळे अवघ्या काही तासांतच मान्सून रविवारी महाराष्ट्रात दाखल झाला. अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे तसेच कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, नांदेड, लातूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबई आणि पुण्यात रात्रीपासून रिमझिम पाऊस सुरु असून पुण्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून अधूनमधून रिमझिम पाऊस बरसत आहे. हा पाऊस पुढील दोन दिवस कायम राहणार असल्याचं देखील हवामान विभागाने स्पष्ट केले.
यंदाच्या वर्षी राज्यात आणि देशभरात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, यंदा देशात मान्सून १०७ टक्क्यांपर्यंत पाऊस पडू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
वर्ष आणि मान्सूनचे आगमन
२०२१: ५ जून
२०२२: १० जून
२०२३: ११जून
२९२४: ६ जून
२०२५: २५ मे