
मोठी बातमी! मंत्री छगन भुजबळ उपमुख्यमंत्री होणार?
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप, उपमुख्यमंत्रीपदाला राजकीय समीकरणे कारणीभूत? हे असणार महत्वाचे कारण?
नाशिक – महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होऊन अर्धे वर्ष उलटून गेल्यावरही नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे. दादा भुसे आणि गिरिश महाजन यांच्यात सुरूवातीला पालकमंत्री पदाची स्पर्धा होती. पण आता यात छगन भुजबळ यांची एंट्री झाली आहे. पण आता महाजन यांनी मोठा दावा केला आहे.
महायुतीत तिन्ही पक्षाचे मोठे नेतड मंत्री झाले आहेत. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. याबाबत आता महायुतीचा घटक पक्ष असलेल्या भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाजन म्हणाले की, छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद दिले असून ते देखील त्या खात्याचा कारभार सांभाळणार असल्याचे सांगितले. याबाबत गिरीश महाजन म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांचे शिवाय होणारच नाही. पालकमंत्री पदावर दावा करणं काय वाईट आहे, मुख्यमंत्र्यांनी ठरवलं तर ते अजून काही होऊ शकतात…तिसरे उपमुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतात, असा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी छगन भुजबळ यांना लगावला आहे. पालकमंत्रीबाबत बोलताना महाजन म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे कुणाला पालकमंत्री करायचं कुणाला मंत्री करायचं. असं कोणी काही म्हटलेलं नाहीये, तुम्ही पत्रकार फक्त त्यामध्ये तेल टाकू नका. नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा असणे काय चुकीचा आहे? चांगलं आहे. ते तर म्हणत असतील की मी होणार आहे तर ते दावा करू शकतात चांगले आहे स्वागत आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी ठरवलं तेथे सुद्धा त्यांना करू शकतात, असे म्हटले आहे. त्यामुळे भुजबळ उपमुख्यमंत्री होणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भाजपशी सोयरीक केलेला कोणताही नेता हा कालांतराने कितीही मर्द असला तरी त्याचा सरपटणारा प्राणी होणार, भाजप गद्दारांसाठी घटनादुरुस्ती करून एकापेक्षा जास्त म्हणजे चार मुख्यमंत्री सुद्धा करू शकतात,” असाही टोला खासदार संजय राऊतांनी लगावला आहे.