
दहा दिवस मी नरेंद्र मोदींचा बंगला पुसायला तयार आहे
भाजपा आमदाराचे वक्तव्य, भाजपा, मोदी आणि आरएसएसचे तोंड भरून काैतुक, कारण काय?
सोलापूर – भाजपा, वचिंत आणि पुन्हा भाजपा असे प्रवास केलेले आमदार गोपीचंद पडळकर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील नेते बनले आहेत. पण सोलापूर येथील सभेत गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. यात त्यांनी नरेंद्र मोदींचे काैतुक केले आहे.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे तोंडभरून कौतुक केले आहे. अहिल्यादेवींची जयंती गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचवली ती केवळ भाजप, नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळेच, जर संधी मिळाली तर नरेंद्र मोदींकडून तुम्ही परवानगी घेऊन द्या मला अहिल्यादेवीची जयंती इतक्या मोठ्या प्रमाणात साजरी केली.मोदी यांच्या बंगल्यावरती जे स्वच्छाता करणारे कामगार आहेत त्यांच्याबरोबर मी दहा दिवस तो बंगला पुसायला तयार आहे. तसेच नरेंद्र मोदी हे अहिलयदेवीच्या पावलावरती पाऊल ठेवून काम करत आहे असे ही गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत. दिल्लीत सध्याचे राष्ट्रपती भवन आणि रायसोनी गावाची जागा ही होळकरांची आहे. याच परिसरात अहिल्यादेवी होळकर यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे. दिल्लीमध्ये मराठा सरदारांनी मोठा दबदबा निर्माण केला. त्यामध्ये मल्हारराव होळकरांचे नाव ऐकल्यावर दिल्ली थरथर कापत होती. हा इतिहास सर्वश्रुत आहे. अशा दिल्लीत अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक व्हावे. तसेच देशभर कुठेही नसलेले मल्हारराव होळकर यांचेही स्मारक होण्यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांकडे लेखी स्वरूपात मागणी करणार असल्याचेही पडळकर यांनी यावेळी सांगितले. या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अजेंड्यावर अहिल्यादेवी होळकर यांची जयंती असल्याचे पडळकर यांनी स्पष्ट केले आहे.
अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीच्या निमित्ताने चौंडी येथे दीपोत्सव आयोजित केला आहे. तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून राष्ट्रपती, मुख्यमंत्री या कार्यक्रमाला येणार असल्याची माहिती पडळकर यांनी दिली. यावेळेस संघाने देशभर जयंती साजरी करत असताना, देशातील अनेक मुख्यमंत्र्यांना देखील अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी करून घेतले असल्याचेही पडळकर यांनी सांगितले.