Latest Marathi News
Ganesh J GIF

ब्रेकिंग! अहमदाबादमध्ये २४२ प्रवासी असलेले विमान कोसळले

अपघातग्रस्त विमानात मा. मुख्यमंत्री करत होते प्रवास, अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल, मोठी जिवितहानी

अहमदाबाद – गुजराथमधील अहमदाबादमध्ये लंडनला निघालेले प्रवासी विमान मानवी वस्तीत कोसळल्याची दुर्देवी घटना घडली आहे. विमानात २०० हुन अधिक प्रवासी होते. या अपघातात मोठी प्रमाणात जिवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

एअर इंडियाचे विमान अहमदाबादवरुन लंडनला जात होते. पण टेक आॅफ केल्यानंतर काही वेळातच ते मेघाणी परिसरात कोसळले. या विमानात २४२ प्रवासी होते. यात
एकूण १६९ भारतीय, १ कॅनेडियन, ७ पोर्तुगीज तर ५३ ब्रिटीश नागरीक प्रवास करत होते. तर २ पायलट आणि १० क्रू मेंबर्स होते. या भीषण विमान अपघाताचे अंगावर काटा आणणारे व्हिडीओ आता समोर आले आहेत. या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील प्रवास करत होते. या घटनेनंतर सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ तात्पुरता बंद करण्यात आला असून, पुढील आदेश मिळेपर्यंत सर्व उड्डाणे आणि विमानवाहतूक बंद राहणार असल्याचे विमानतळ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या दुर्घटनेत किती जणांचा मृत्यू झाला किंवा जखमी झाले, यासंबंधी अधिकृत पुष्टी अद्याप झाली नसली तरी प्रशासन आणि आपत्कालीन सेवांचा घटनास्थळी तातडीने प्रतिसाद सुरू आहे. विमानतळापासून मेघानीनगरचे अंतर सुमारे 15 किलोमीटर आहे. अपघातानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्यास सुरुवात केली. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी गर्दी केली आहे.

 

शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्व डॉक्टरांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून, आपत्कालीन सेवा सज्ज करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलिस, एनडीआरएफ आणि वैद्यकीय पथकांनी बचाव कार्य सुरू केलं आहे. अपघाताचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!