Latest Marathi News
Ganesh J GIF

प्रेमभंग झाल्यामुळे ‘तिने’ अहमदाबादचे विमान पाडले?

अहमदाबाद विमान अपघात प्रकरणात धक्कादायक खुलासा, धमकीचे मेल पाठवत इशारा दिला आणि म्हणाली, धमकी विनोद...

अहमदाबाद – १२ जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान टेकऑफ केल्यानंतर अवघ्या ३० सेकंदांनी एअर इंडियाचे विमान कोसळून झालेल्या अपघातात २७५ हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. या अपघाताने सगळा देश सुन्न झाला होता. पण यामागील कटाचा उलगडा होत असून धक्कादायक कारण समोर आले आहे.

या विमान अपघातानंतर याच्या चाैकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली होती. पण पोलीसांना एक मेल आल्याने यात धक्कादायक कारणांचा खुलासा झाला आहे. पोलिसांनी चेन्नईतील रेने जोसिल्डा या तरुणीला अटक केली आहे. रेनेचे दिविज प्रभाकर या तरुणावर एकतर्फी प्रेम होते. पण प्रभाकर याने फेब्रुवारीमध्ये दुसऱ्या मुलीशी लग्न केले. यामुळे ती प्रचंड संतापली. त्यानंतर तिने प्रभाकरच्या नावानेच ईमेल आयडी तयार केले आणि देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब असल्याचे ईमेल पाठवायला सुरुवात केली. दिल्लीपासून पंजाब, महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडूपर्यंत जवळपास १२ राज्यांमध्ये २१ हून अधिक खोट्या धमक्या पाठवल्या. पोलीसांपासून वाचवण्यासाठी तिने डार्क वेब, व्हर्च्युअल आयडेंटिटी आणि बनावट ईमेल आयडींचा उपयोग केला. जेव्हा एअर इंडियाचं विमान कोसळल्याची बातमी आली आणि त्यानंतर रेनेने बी.जे. मेडिकल कॉलेजला एक ईमेल पाठवला, ज्यात तिने दावा केला की विमान अपघात तीनेच घडवला आहे. तिच्या शब्दांमध्ये “आता तरी माझी शक्ती समजली असेल ना? आम्ही खेळत नव्हतो.” यामुळे पोलिस आणि गुप्तचर यंत्रणा अधिकच सतर्क झाल्या, त्यांनी तिचा शोध घेण्यास सुरूवात केली. अखेर सायबर सेलच्या मदतीने अहमदाबाद पोलिसांनी तिला अटक केली. त्यानंतर या सर्व प्रकरणाचा उलगडा झाला. रेनेने यापूर्वीही अहमदाबादमध्ये त्याने नरेंद्र मोदी स्टेडियम, जिनेव्हा लिबरल स्कूल आणि एक हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी दिली होती. पोलीस आता त्या तरुणीची चाैकशी करत असून नवीन गोष्टीचा खुलासा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विमानातील ब्लॅक बॉक्सची तपासणीदेखील सुरु आहे, यात कोणता घातपात झाला आहे का? हे स्पष्ट होणार आहे. पण या तरुणीमुळे सरकारी यंत्रणेला मोठे नुकसान आणि गोंधळाला सामोरे जावे लागले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!