
मोठी बातमी! एकनाथ शिंदे पुन्हा होणार राज्याचे मुख्यमंत्री?
भाजपाने एकनाथ शिंदेपुढे ठेवली ही अट?, एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार?, राजकारणात पुन्हा खळबळ?
मुंबई – भाजपने एकनाथ शिंदेंना भाजपात पक्ष विलिन करायला लावला आणि त्या मोबदल्यात मुख्यमंत्री पद दिलं तर एकनाथ शिंदे हे लगेच भाजपमध्ये जातील असं खळबळजनक विधान संजय राऊत यांनी केले आहे. एकनाथ शिंदे यांना पक्षापेक्षा पद महत्वाचे आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनील्या दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक दावे केले आहेत. एकनाथ शिंदेंना भाजपने ऑफर दिली की, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री पद देतो, पण तुम्ही भाजपमध्ये सामील व्हा. तर ते एका मिनिटाचा विचार न करता भाजपमध्ये सामील होतील. ते एकदाही चोरीचे का असेना पण शिवसेना नावाचा किंवा पक्षाचा विचार करणार नाहीत, असा दावा राऊत यांनी केला आहे. शिंदेकडे असणाऱ्या शिवसेनेचे वेगळे असे कोणतेच अस्तिव सध्या दिसत नाही, ते कधीचेच भाजपात विलीन झाले आहेत, त्यांची विधाने त्याचपद्धतीची असतात, असेही संजय राऊत म्हणाले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपसोबत युती केली होती. त्यांनी पक्ष विलीन केला नव्हता. पण एकनाथ शिंदे यांनी तसे केले असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. यावेळी ठाकरे बंधूच्या एकत्र येण्यावरही संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. फडणवीस, प्रफुल्ल पटेल आणि हसन मुश्रीफ एकत्र येऊ शकतात, तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे का एकत्र येऊ शकत नाही, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एकत्रित मोर्चाची घोषणा झाल्यावर सरकारने धसकाच घेतला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठी लोक या मोर्चासाठी येणार होते. त्यामुळे फडणवीस यांच्या सरकारला हिंदी सक्तीचा आदेश मागे घ्यावा लागला, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.