
भाजपा नेत्याची माफी मागा म्हणत अतिरिक्त आयुक्तांना बेदम मारहाण
कार्यालयातून फरफटत बाहेर काढत लाथाबुक्क्यांनी मारहाण, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल, या भाजपा नेत्याचा उल्लेख, कारण काय?
भुवनेश्वर – भाजपा नेत्याची अलीकडे वादग्रस्त आणि दादागिरी केल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. आता हे लोन महाराष्ट्राबरोबरच ओडिशामध्ये देखील गेले आहे. याठिकाणी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एका सरकारी अधिकाऱ्याला बेदम मारहाण केली आहे.
भुवनेश्वर महानगरपालिकेचे (बीएमसी) अतिरिक्त आयुक्त रत्नाकर साहू यांच्यावर भाजपा पदाधिकाऱ्यांनी हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भाजप नेत्याची माफी माग असं म्हणत काही गुंडांनी अतिरिक्त आयुक्तांवरच हा हल्ला केला. रत्नाकर साहू यांना काही गुडांनी त्यांच्या कार्यालयातून ओढत बाहेर नेलं. त्यांना मारहाण करण्यात आली. गुंडांनी एका भाजप नेत्याची माफी मागायाला लावली. अतिरिक्त आयुक्त असलेले रत्नाकर साहू हे कार्यालयात जनसुनावणीत लोकांच्या तक्रारी ऐकत होते. त्यावेळी जगन्नाथ प्रधान यांच्या नावाने विचारणा करत आलेल्या तरुणांनी थेट अतिरिक्त आयुक्तांवरच हल्ला केला. त्यावेळी जगन्नाथ प्रधान यांची माफी मागण्यास सांगितलं. यामागचं कारण मात्र अद्याप स्पष्ट नाही. यावेळी त्या गुंडानी साहू यांना कार्यालयातून फरफटत नेत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. जगन्नाथ प्रधान हे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. ते भाजपाकडुन निवडणुक लढवत होते. गुंड हे नेमक्या कोणत्या प्रकाराबद्दल माफीची मागणी करत होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान साहू यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
तब्बल २५ मिनिटे हा सगळा प्रकार सुरू होता. त्यावेळी कार्यालयात शेकडो कर्मचारी आणि खासगी सुरक्षा रक्षकसुद्धा बघ्याच्या भूमिकेत होते. शेवटी भुवनेश्वरच्या महापौरांनी साहू यांना गुंडांच्या तावडीतून सोडवले. त्यानंतर सर्व शांत झाले.