Latest Marathi News
Ganesh J GIF

मोठी बातमी! अजित पवार होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री?

देवेंद्र फडणवीसांना मिळणार राष्ट्रीय पातळीवरील जबाबदारी, शिंदे गटात अस्वस्थता, राजकीय पटलावर बदलाचे संकेत?

मुंबई – स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच आता मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेने जोर धरला आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे शिंदे गट अस्वस्थ झाला आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत जळगाव येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी तटकरे यांनी महानगर पालिकेच्या निवडणुका महायुतीसोबतच लढणार असल्याचे संकेत दिले आहेत. तटकरे म्हणाले, अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्रा व्हावे अशी त्यांची क्षमता आहे. कार्यकर्त्यांसह प्रत्येकाला पवार हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत असे वाटत आहे. त्यासाठी पक्षाची ताकद वाढविण्याची गरज आहे. असेही तटकरे म्हणाले आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अजित पवार मुख्यमंत्री होणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात घडत असतात. एकनाथ शिंदे ४० आमदार असतानाही मुख्यमंत्री होऊ शकतात, तर अजित पवार का नाही? असा प्रश्न पवार समर्थक उपस्थित करत असतात. त्याचबरोबर फडणवीस यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार असेही बोलले जात असते. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा मध्यंतरी रंगली होती. पण नंतर आपण महाराष्ट्रातच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. पण भाजपा अचानक धक्कातंत्राचा वापर करु शकतो. आणि फडणवीस अधयक्ष होऊ शकतात. कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस मंत्रिमंडळात सहभागी होणार नव्हते. पण पक्षाकडून आदेश आल्यानंतर फडणवीस उपमुख्यमंत्री झाले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा फडणवीस यांची बदली आणि अजित पवार मुख्यमंत्री अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू झाली आहे.

अजित पवार मुख्यमंत्री होणार या चर्चा होत असल्या तरीही एकनाथ शिंदे गटाची त्यावर प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. पण पवार यांना विरोध केला जाऊ शकतो. अर्थात अमित शहांकडून तसा संदेश आला तर हा विरोध मावळू देखील शकतो.त्यामुळे सध्या तरी मुख्यमंत्री बदल जर तर वर अवलंबून आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!