
भारताच्या ‘या’ स्टार क्रिकेटरला होणार दहा वर्षाची शिक्षा?
'या' क्रिकेटपटूवर तरुणीचे गंभीर आरोप, लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण केल्याचा आरोप, क्रिकेटपटू म्हणाला...
गाझीयाबाद – पहिल्यांदाच ट्रॉफी उंचावलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा वेगवान गोलंदाज यश दयाल सध्या गंभीर अडचणीत सापडला आहे. गाजियाबादमधील एका युवतीने त्याच्यावर लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक, मानसिक आणि आर्थिक शोषण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
यश दयाल सध्या या प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यापूर्वी तो गुजरात टायटन्सकडून खेळला आहे. या प्रकरणाने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. तक्रारदार तरुणीने पोलिसांना सांगितले की, यश दयालने दीर्घकाळ लग्नाचे वचन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि आर्थिक तसेच मानसिक दबाव आणला. तिने पुरावे म्हणून चॅट्स, स्क्रीनशॉट्स, व्हिडिओ कॉल्स आणि फोटोंचा उल्लेख केला आहे. तसेच, गेल्या पाच वर्षांपासून त्यांचे संबंध होते, असेही तिने नमूद केले. याशिवाय, दयालचे इतर दोन-तीन मुलींशीही असेच संबंध असल्याचा आरोप तिने केला आहे. तक्रार दाखल करण्यापूर्वी तरुणीने महिला हेल्पलाइन आणि मुख्यमंत्र्यांच्या पोर्टलवरही संपर्क साधला होता. पीडित मुलीने तिच्या आरोपांसंदर्भात व्हॉट्सअॅप चॅट्स, व्हिडिओ कॉल्स आणि फोटोंचे स्क्रीनशॉट असे पुरावे देखील सादर केले आहेत, ज्याची पोलिस चौकशी करत आहेत. एखाद्या पुरुषाने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन किंवा फसवणुकीने एखाद्या महिलेसोबत लैंगिक संबंध प्रस्थापित केले असतील, तर त्यावर या कलमांतर्गत कारवाई होते. या कलमाअंतर्गत दोषी आढळल्यास आरोपीला दहा वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. दरम्यान यश दयालच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पीडित तरुणीने १४ जून रोजी महिलांच्या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल केला होता. मात्र, पुरेसी मदत न मिळाल्याने तिने २१ जून रोजी सीएम हेल्पलाइन नंबरवर तक्रार केली होती.
यश दयालने धक्कादायक दावा करत म्हटलं आहे की, ज्या मुलीने त्याच्याविरुद्ध हा खटला दाखल केला आहे तिने त्याचा आयफोन आणि लॅपटॉप चोरला आहे, तर यश दयाल यांनी त्यांच्यावर लाखो रुपयांची चोरी केल्याचा आरोपही केला आहे. यश दयालने प्रयागराज पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.