Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात एफसी रोडवर धर्मांतरासाठी चालतेय ड्रेस रॅकेट

कमी किमतीत ड्रेस विकत होतेय धर्मांतर, आरक्षणाचा लाभ घेऊन धर्म बदलणारे आता रडारवर

पुणे – सांगलीतील एक तरूणीने धर्मांतरासाठी होणारा त्रास असह्य झाल्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर धर्मांतर आणि लव्ह जिहाच्या मुद्द्यावरून भाजप नेते गोपीचंद पडळकर आक्रमक झाले असल्याचे पाहायला मिळत आहेत. आता त्यांनी पुण्याबाबत धक्कादायक विधान केले आहे.

पुण्यातील एका कार्यक्रमांमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुण्यामध्ये लव्ह जिहादचा ‘एफसी रोड पॅटर्न’ सुरू असल्याचं दावा केला आहे. ते म्हणाले की, इतर ठिकाणी ४०० रूपयांना रूपयांना मिळणारा शर्ट एका दुकानात २०० रूपयांना मिळतो. त्यामुळे अनेक मुली त्या ठिकाणी गर्दी करतात. आजकाल अनेक ठिकाणी आॅनलाईन बिल केले जाते. त्यातून त्यांचे नंबर गोळा केले जाते. त्या मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून त्या मुलींना टार्गेट केलं जातं आणि त्यातील चार-पाच मुलींना लव जिहादच्या बळी पाडलं जातं.’, असा दावा पडळकर यांनी केला आहे. यावेळी त्यांनी हिंदूंच्या मुली बाटवण्यासाठी षडयंत्र सुरू आहे.’, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत. या कार्यक्रमात गोपीचंद पडळकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर टिका केली आहे. ‘एक घर पुण्यातलं आहे, ते मटण खाऊन दगडूशेठला जातात, त्यांची सासू ख्रिश्चन आहे, नवरा कोण ब्राह्मण आहे आणि बाप मराठा आहे’ अशा शब्दात टीका केली आहे. मागासवर्गीय हिंदू म्हणून आरक्षणाचा लाभ घेऊन नोकरी मिळवली आणि नंतर मात्र धर्मांतर केले, तर त्यांना नोकरीवरून बडतर्फ करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. असे आरक्षणाचा लाभ घेऊन धर्मांतर केलेले लोक शोधा आणि त्यांना नोकरीतून बडतर्फ करण्याची मागणी करा,” असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. धर्मांतरण विरोधी कायदा येत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, असा निर्धारही पडळकर यांनी व्यक्त केला आहे.

ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी विवाहितेवर तिच्या नणंदेसह एका धर्मगुरूकडून जबरदस्ती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ख्रिश्चन धर्म स्वीकारत नसल्यामुळे नणंदेनं महिलेला मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!