Latest Marathi News
Ganesh J GIF

रिलसाठी स्टंट करायला गेला आणि थेट दरीत कोसळला

जीवघेण्या अपघाताचा थरारक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, टेबल पाॅईंटवर नेमके काय घडले? पहा व्हिडिओ

सातारा – सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्याजवळील गुजरवाडी घाटात एका युवकाने स्टंट करत असताना आपली कार ३०० फूट दरीत घसरून फेकली गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघाताचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

साहिल जाधव कारमध्ये बसून फोटो घेत असताना अचानक कार मागे वळवण्याचा प्रयत्न करताना ब्रेक न लागल्याने ती घसरून सरळ दरीत कोसळली. अपघातस्थळी उपस्थित असलेल्या पोलिस प्रशिक्षणार्थी आणि रेस्क्यू पथकाच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले. त्याला तातडीने कन्हड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. सडावाघापूर येथे जात असताना टेबल पाॅइंटवर अनेक पर्यटक फोटो शूट व करमणुकीसाठी थांबतात. बुधवारी सायंकाळी साहिल अनिल जाधव हे आपल्या मित्रांसमावेत फिरण्यासाठी आले होते. सोबतचे मित्र फोटो काढण्यात मग्न होते. दरम्यान, गाडीमध्ये साहिल जाधव होते. गाडीला ब्रेक लागला नसल्याने व गवतावरून गाडी घसरत गेल्याने ही गाडी खोल दरीत कोसळली. दरीत गाडीसोबत अडकलेल्या साहिलला बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी सुरूल येथील किंगमेकर अ‍ॅकॅडमीच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची मदत घेतली. तर या परिसरात बकरी चरावयास आलेल्या मंगेश जाधव या म्हावशी येथील युवकाने मोठ्या धाडसाने गाडीचा दरवाजा तोडला. त्यामुळे सुमारे तासाभराच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर साहिलला झोळीत घालून दरीतून रस्त्यावर आणण्यात यश आले. दरम्यान घटनास्थळी विकास संकपाळ, अमित जाधव, पाटण पोलिस ठाण्याचे अधिकारी अविनाश कवठेकर, जय घाडगे, संकेत घाडगे, टेबल पाॅइंटचे मालक परिसरातील नागरिक यांनी प्रयत्न केले व जखमी व्यक्तीस उपचारासाठी सह्याद्री हाॅस्पिटल कऱ्हाड याठिकाणी पाठवण्यात आले. या घटनेमुळे पर्यटनस्थळी सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. स्थानिक प्रशासनाने या टेबल पॉइंटजवळ सुरक्षिततेच्या उपाययोजना त्वरित राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.

 

पाटणपासून अवघ्या तीन ते चार किलोमीटर अंतरावर पाटण-सडावाघापूर मार्गावरील गुजरवाडी गावच्या हद्दीत घाटमार्गाच्या मधोमध असलेला सपाट भूभाग ‘टेबल पॉइंट’ म्हणून ओळखला जातो. या ठिकाणाच्या दोन्ही बाजूला खोल दऱ्या असून, उलटा धबधबा पाहण्यासाठी व फोटोसेशनसाठी दररोज अनेक पर्यटक येथे थांबतात. निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!