
पत्नीच्या हत्येमुळे पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत जिवंत
महाराष्ट्रात धक्कादायक प्रकार समोर, पोलिसही हादरले, प्रियकरासाठी महिलेने पतीलाच अडकवले, पण....
सोलापूर – महाराष्ट्रात अलीकडे विवाहबाह्य संबंधातून पती किंवा पत्नीची हत्या करण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पण सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. ती पाहून पोलिसही चकित झाले. समोर आलेले प्रकरण खुपच गुतांगुंतीचे आहे.

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील दशरथ दांडगे यांची मुलगी किरण हिचा विवाह नागेश सावंत याच्याशी तीन वर्षापूर्वी झाला होता. त्यांना एक दोन वर्षांची मुलगीही आहे. अलीकडे त्यांच्यात सातत्याने वाद होत होते. नागेश यांचा हाॅटेलचा व्यवसाय असल्याने ते उशीरा घरी येत असत. घटनेच्या दिवशीही ते उशीरा घरी आल्यानंतर त्यांच्यात वाद झाला. किरणचे चुलत सासरे दत्तात्रेय सावंत यांनी १४ जुलै रोजी पहाटे किरणच्या वडिलांना फोन केला आणि तुमची मुलगी किरणने स्वतःला पेटवून घेतले आहे, तुम्ही या,” असे त्यांनी सांगितले. यानंतर किरणचे कुटुंबीय तत्काळ पाटकळला पोहोचले. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. पण गंजीत मृतदेह असल्यामुळे वडिलांना संशय आला. किरण हिच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी तपास सुरू केला. मृतदेहाचे अवशेष फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले. किरणच्या वडिलांनी सांगितले की, “तो मृतदेह ओळखण्यापलीकडे होता. नागेश सावंत यांनी सांगितले की, माझ्या मुलीला कोणी मारले? याची चौकशी करा,” अशी मागणी त्यांनी केली. पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली. पोलीसंनी सुरूवातीला पती नागेश यांना ताब्यात घेतले. पण नंतर किरण ही सातारा जिल्ह्यातील कराड इथं एका व्यक्तीसोबत जिवंत सापडली आहे. प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी विवाहित महिलेने प्रियकराच्या साथीने एका दुसऱ्या महिलेचा मृतदेह आपल्या घरासमोर आणून जाळला आणि स्वत:च्या हत्येचा बनाव रचला, असं पोलीस सूत्रांकडून सांगितलं जात आहे. मात्र ती महिला कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकूणच धक्कादायक प्रकार समोर आल्यामुळे अनेकजण चकित झाले आहेत.

मंगळवेढ्यात घरासमोर सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचे अवशेष सोलापूरच्या फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले. पोलिसांनी सांगितले की, DNA तपासणी आणि फॉरेन्सिक अहवालानंतरच त्या महिलेची ओळख पटू शकेल. त्यामुळे आता सगळ्यांचे लक्ष त्या अहवालाकडे लागले आहे.


