Latest Marathi News
Ganesh J GIF

स्कुटीवर जाणा-या तरुणीला भरधाव डंपरने चिरडले

भीषण अपघातात तरुणीच्या शरीराचे दोन तुकडे, भावाच्या वाढदिवसाचा उत्साह पण काळाने डाव साधला

ठाणे – ठाण्यातील घोडबंदर रोडवर रविवारी भीषण अपघात झाल्याचं समोर आला आहे. या अपघातामध्ये २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना नागला बंदर परिसरात रात्री १० वाजता झाली. तरुणी कॅडबरी जंक्शनजवळ दुचाकीवरून जात असताना ती डंपरखली आली आणि तरुणीच्या शरीराचे थेट दोन तुकडे झाले.

मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव गजल टुटेजा असे नाव आहे. ती घोडबंदर परिसरातील एका सोसायटीत राहत होती. गजल तुटेजा रविवारी रात्री 10 वाजता येथील पेट्रोल पंपाजवळून जात असताना डंपरने तिला चिरडले. गजल ही तिच्या कुटुंबातील एकटी कमावणारी होती. तिच्या मृत्यूमुळे घोडबंदर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गजल तुटेजा ही ठाण्यातील एका खासगी कंपनीत कामाला होती. तिला वडील नसल्यामुळे घराची जबाबदारी तिच्या खांद्यावर होती. तिच्या घरात आई आणि लहान भाऊ होता. गजल ही नोकरीसोबत पोळीभाजीचा व्यवसायही करायची. प्रचंड कष्ट करत होती. अपघाताच्या दिवशी गजलने तिचा भाऊ अक्की याला बाहेर जेवायला जाऊ असे सांगितल होते. मी दोन मिनिटांत घराच्या खाली येतेय, तू खाली ये, आपण मस्त जेवायला जाऊयात, असे गजल म्हणाली होती. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच गजलचा अपघात झाला. गजलचा भाऊ अक्की याने रस्त्यावर पडलेला आपल्या बहिणीचा मृतदेह पाहिला. तो पेट्रोल पंपाजवळ बहिणीची वाट पाहत होता. तेव्हा त्याला रस्त्यावर प्रचंड गर्दी दिसली. तिथे जाऊन पाहिल्यानंतर अक्कीला त्याच्या बहिणीचा मृतदेह दिसला. त्याने सांगितले की, ‘मी खाली गेलो, दिदीला खूप फोन लावले, पण तिने फोन उचलला नाही, थोडे पुढे गेलो तेव्हा तिथे गर्दी दिसली मी त्या गर्दीतून वाट काढत गेलो. तेव्हा मला दिसले की, दीदीच्या अंगावरुन डंपर गेला होता तिच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते. मी लगेच आईला फोन केला’, असे अक्की तुटेजा याने सांगितले. अपघात इतका भीषण होता की गजलच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते. यामुळे बराच वेळ तिच्या मृतदेहाला हात लावण्यास कोणीही शेवटी आईनेच मुलीचा मृतदेह उचलून रुग्णवाहिकेत ठेवला. पण तोपर्यंत तीची प्राणज्योत मालवली होती.

जिथं गजलचा अपघात झाला त्या नागला बंदर परिसरात रस्त्यांची चाळण झाली आहे. मोठे खड्डे असल्यानं सतत अपघात होत असतात. खड्ड्यामुळे गजलचे स्कुटीवरचं नियंत्रण सुटल्याची शक्यता असून यामुळे ती डंपरखाली गेल्याची शक्यता वाहतूक पोलिसांनी व्यक्त केली आहे. कुटुंबातली एकमेव कमावणारी गजल अपघातात गेल्यानं तिच्या आईला आणि लहान भावाला मोठा धक्का बसला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!