
धक्कादायक! डे-केअरमध्ये चिमुकल्या मुलीला बेदम मारहाण
मारहणीचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल, चावा घेतला, जमिनीवर आपटले, व्हिडिओ पाहून थरकाप उडेल
नोएडा- लहान मुलांना डे केअर मध्ये ठेवण्याचे प्रमाण वाढले आहेत. आई आणि वडिल दोघेही नोकरी करत असल्यामुळे नाईलाजाने का होईना त्यांना आपल्या चिमुकल्यांना डे केअरमध्ये ठेवणे भाग पडते. पण आता एका डे केअरचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
नोएडातील एका डे-केअरमध्येच एका १५ महिन्याच्या निष्पाप चिमुकलीवर अमानुष मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगी रडायची थांबत नसल्यामुळे केअर टेकर असणा-या मुलीने चिमुकल्या मुलीवर अत्याचार केले आहेत. तिने मुलीला मारहाण तर केलीच पण त्याचबरोबर तिचा चावा घेत तिला जमिनीवर देखील आपटण्यात आले. मुलीची आई आपल्या मुलीला घेण्यासाठी आली असता. मारहाणीच्या खुनांबद्दल तिने चाैकशी केली. पण हवेमुळे असे झाले असेल असे सांगण्यात आले. पण आईने आपल्या मुलीला डाॅक्टरांकडे घेऊन गेली. डॉक्टरांनी तपासणीदरम्यान सांगितले की, मुलीसोबत मारहाण झाली आहे. त्यामुळे तिने सीसीटीव्ही फुटेज पाहिजे असता, तिला धक्काच बसला. कारण तिच्या मुलीला अतिशय क्रुर पद्धतीने मारहाण करण्यात आली होती. मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल करण्याचा इशारा दिल्यानंतर विविध लोकांकडून दबाव टाकून तिला माफीनामा घेऊन विषय मिटवण्याचा सल्ला देण्यात आला. पण तिने त्याला स्पष्ट नकार दिला. दरम्यान अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर नियमावली लागू करण्याची मागणी होत आहे.
या प्रकरणात पोलिसांनी तक्रार दाखल केली असून, पीडितेच्या आईने फक्त देखरेख करणाऱ्या महिलेवरच नव्हे, तर डे-केअरच्या मालक चारू अरोरा यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. घटनेमुळे पालकांमध्ये प्रचंड संताप असून, डे-केअर सेंटरच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.