
धनंजय मुंडे यांनी दुसऱ्या पत्नीसोबत माझ्या घरी रहायला यावे
धनंजय मुंडे यांना पहिल्या पत्नीची आॅफर, मुंडे यांची आमदारकी जाणार असल्याचा दावा
मुंबई – धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद जाऊन काही दिवस उलटली आहेत. मात्र, त्यांनी अजूनही शासकीय बंगला सोडला नाहीये. धनंजय मुंडेंनी बंगला सोडला नसल्याने छगन भुजबळ यांना मंत्री होऊनही शासकीय निवासस्थान मिळू शकले नाही. पण आता धनंजय मुंडेंना त्यांच्या पहिली पत्नी करुणा मुंडे यांना मोठी आॅफर दिली आहे.
धनंजय मुंडे हे शासकीय बंगला कधी सोडणार यावरून चर्चा सुरू आहे. तसेच बंगला सोडला नसल्यामुळे त्यांना ४२ लाखाचा दंड करण्यात आला आहे. यावर करुणा शर्मा मुंडे यांनी मोठे विधान केले आहे. करुणा मुंडे म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांचे मुंबईत तीन ते चार घर आहेत. पवई, मलबार हिल आणि सांताक्रूझमध्येही. जर धनंजय मुंडेंना घर नसेल तर त्यांनी त्यांच्या दुसऱ्या पत्नीसोबत माझ्या घरी यावे. मी त्यांना माझ्या घरात घेईल. मुंडे म्हणतात की मुलीच्या शिक्षणासाठी आणि प्रकृतीच्या कारणास्तव ते सरकारी बंगल्यात राहतात. पण ही केवळ थाप आहे. त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळेल, असं वाटत असेल तर ते स्वप्न आहे. त्यांची आमदारकीच धोक्यात आहे. त्यामुळे सांताक्रुझचा फ्लॅट आहे, तिथे येऊन राहा आणि सरकारी निवासस्थान तातडीने रिकामं करा. त्याचबरोबर करुणा मुंडे म्हणाल्या की, जेव्हा त्यांनी निवडणूक लढवली तेव्हा निवडणूक आयोग धनंजय मुंडेंना पाठिंबा देत होते. तसंच, निवडणूक आयोग सत्तेत असलेल्या मोठ्या नेत्यांसाठी काम करते असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आली आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी तब्येतीचे कारण देत थेट राजीनामा दिला. आता करुणा मुंडे यांनी दिलेली ऑफर धनंजय मुंडे स्वीकारणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीदरम्यान धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रात गिरगाव चौपाटीवरील एन.एस. पाटकर मार्गावरील वीरभवन इमारतीत त्यांच्या नावे घर असल्याचा उल्लेख आहे. मात्र, हे घर सध्या वापरात नसल्याची माहिती आहे.