Latest Marathi News
Ganesh J GIF

आजपासून फास्टटॅगची वार्षिक टोलपास योजना सुरु

केवळ तीन हजारात मिळणार टोलपास, एवढ्या ट्रिपची संधी, 'या' टोलनाक्यावर चालणार पास

दिल्ली – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी फास्टटॅगबद्दल मोठी घोषणा केली होती. प्रवासी ३००० रुपयांमध्ये फास्टटॅगचा वार्षिक पास काढू शकणार आहेत.

नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरात १५ ऑगस्टपासून प्रवाशांना संबंधित पास मिळवता येणार आहे. त्यानुसार आजपासून प्रवाशांसाठी ही सुविधा सुरु झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. एकूण २०० ट्रीपसाठी हा पास असणार आहे. फास्टॅगचा वार्षिक पास सक्रिय झाल्यावर, तो एक वर्षासाठी किंवा २०० फेऱ्या पूर्ण होईपर्यंत वैध राहील. एक वर्ष पूर्ण झाल्यावर किंवा 200 फेऱ्या पूर्ण झाल्यावर, फास्टॅग पुन्हा पूर्वीप्रमाणेच काम करू लागेल. म्हणजे, तुम्हाला बॅलन्स रिचार्ज करावा लागेल. फास्टॅगचा हा वार्षिक पास फक्त राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवरील टोलनाक्यांवर वैध असेल. महामार्ग किंवा एक्सप्रेसवे राज्याचा किंवा खासगी असेल, तर तुम्हाला या पासवर मोफत प्रवेश मिळणार नाही. महाराष्ट्रातील ९६ टोलनाक्यांवर हा पास चालणार आहे.

महाराष्ट्रातील वैध टोलनाके
१. चारोटी – सुरत-दहिसर
२. खानीवाडे – सुरत-दहिसर बायपास
३. अहमदनगर बायपास – अहमदनगर बायपास
४. तिडगुंडी – सोलापूर-विजापूर
५. तसावडे – सातारा-कागळ
६. किणी – सातारा-कागळ
७. सावळेश्वर – पुणे-सोलापूर
८. वरवडे – पुणे-सोलापूर
९. पाटस – पुणे-सोलापूर
१०. सरडेवाडी – पुणे-सोलापूर
११. आनेवाडी – खंडाळा-सातारा
१२. खेड-शिवपूर – वेस्टर्ली डायव्हर्जन टू पुणे, कात्रज रियललाइनमेंट आणि कात्रज-सारोळे
१३. चांदवड – पिंपळगाव-धुळे
१४. लालींग – पिंपळगाव-धुळे
१५. बसवंत – पिंपळगाव-नाशिक-गोंडे
१६. घोटी – वडापे-गोंडे
१७. अर्जुनल्ली – वडापे-गोंडे
१८. तामलवाडी – सोलापूर-येडशी
१९. येडशी – सोलापूर-येडशी
२०. धोकी – एंड ऑफ आणे घाट टू स्टार्ट ऑफ अहमदनगर
२१. दुमहरवाडी – माळशेज घाट टू आणे घाट
२२. हिवरगाव पावसा – खेड-सिन्नर
२३. फुलवाडी – सोलापूर-एमएएच/केएनटी बॉर्डर
२४. तळमोड – सोलापूर-एमएएच/केएनटी बॉर्डर
२५. चाळकवाडी – खेड-सिन्नर
२६. वळसांग – अक्कलकोट-सोलापूर
२७. नंदानी – सोलापूर-विजापूर
२८. चाचाडगाव – नाशिक-पेठ
२९. अनकधाळ – सांगली-सोलापूर (पॅकेज-१)
३०. बोरगाव – सांगली-सोलापूर (पॅकेज-१)
३१. इचगाव – सांगली-सोलापूर (पॅकेज-३)
३२. पिंपरवाळे – सिन्नर-शिर्डी
३३. डोंगराळे – कुसुंबा ते मालेगाव
३४. पेनूर – मोहोळ-वाखरी आणि वाखरी-खुडूस
३५. पिंपरखेड – चाळीसगाव-नांदगाव-मनमाड
३६. उंडेवाडी – पाटस-बारामती
३७. बंपिप्री – अहमदनगर-घोगरगाव-सोलापूर बॉर्डर
३८. निमगाव खालू – अहमदनगर-किनेटिक चौक ते वाशुंडे फाटा
३९. पंडणे – सरद-वाणी पिंपळगाव
४०. बावडा – इंदापूर-बोंडाळे (संत तुकाराम महाराज पालखी मार्ग)
४१. भवानीनगर – खुद्दूस-धर्मपुरी-लोनांद
४२. बडेवाडी – खरवडी कासार-जंक्शन
४३. गोंधखैरी – नागपूर-कोंढळी
४४. करंजा घाडगे – कोंढळी-तळेगाव
४५. निंभी – नांदगाव पेठ-मोरशी
४६. नांदगाव पेठ – तळेगाव-अमरावती
४७. कुरणखेड – अमरावती-चिखली (पॅकेज-१)
४८. तरोडा कसबा – अमरावती-चिखली (पॅकेज-३)

४९. उंद्री – खामगाव-चिखली
५०. तुप्तकळी – आरणी-नायगाव बांधी
५१. मेडशी-सावरखेडा – अकोला-मेडशी (पॅकेज-१)
५२. धुम्का-तोंडगाव – मेडशी-बुलढाणा (पॅकेज-२)
५३. करोडी – औरंगाबाद-करोडी
५४. हातनूर – करोडी-तेलवाडी
५५. माळीवाडी-भोकरवाडी – येडशी-औरंगाबाद
५६. पादळसिंगी – येडशी-औरंगाबाद
५७. पारगाव – येडशी-औरंगाबाद
५८. वैद्याकीन्ही – मांजरसुम्बा-चुंभळीफाटा
५९. नायगाव – मंठा-पातुर
६०. लोणी – परतूर-माजलगाव
६१. शेंबळ – वरोरा-वणी
६२. हिरापूर – गडचिरोली-मूल
६३. खरबी – नागभीड-आर्मोरी
६४. केलापूर – वडनेर देवधरी केळापूर
६५. हुस्नापूर – यवतमाळ-वर्धा
६६. निअर हळदगाव – वर्धा-बुटीबोरी
६७. वडगाव – कळंब राळेगाव वडकी
६८. उमरेड – कळंब राळेगाव वडकी
६९. सोंगिर – एमपी/एमएच बॉर्डर – धुळे
७०. शिरपूर – एमपी/एमएच बॉर्डर – धुळे
७१. बोरविहीर – बोध्रे-धुळे
७२. दासरखेड – नांदुरा ते चिखली
७३. नाशिराबाद – चिखली ते तारसोड
७४. सुबगव्हाण – तारसोड ते फागणे
७५. दरोडा – बोरखेडी-जाम-वडनेर
७६. नंदुवाफा – सीजी/एमएच बॉर्डर टू वैनगंगा ब्रीज
७७. बोरखेडी – नागपूर हैदराबाद
७८. पांजरि – नागपूर बायपास
७९. खुमारी – एमपी/एमएच बॉर्डर नागपूर
८०. कामठी कन्हान – कामठी कन्हान बायपास नागपूर
८१. मठानी – नागपूर ते वैनगंगा
८२. सेलू – सावनेर-धापेवाडा-काल्मेश्वर गोंडखैरी
८३. चंपा – नागपूर-उमरेड
८४. भागेमारी – नागपूर-बैतुल
८५. मिलानपूर – नागपूर-बैतुल
८६. खांबारा – नागपूर-बैतुल
८७. खडका – रिंग रोड नागपूर पॅकेज – १
८८. पावनगाव – रिंग रोड नागपूर पॅकेज – २
८९. सेलू अंबा – लोखंडी सावरगाव ते रेणापूर
९०. अष्टा – औसा ते चाकूर
९१. मालेगाव – चाकूर ते लोहा
९२. परडी माक्ता – लोहा ते वारंगफटा
९३. बिजोरा – वारंगा ते महागाव
९४. आशीव – तुळजापूर ते औसा
९५. सालावा झारोडा – पांगारे ते वारंगा फाटा
९६. भांब राजा – महागाव ते यवतमाळ

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!